परभणी जिल्ह्यात खरीप पीक कर्जवाटप उद्दिष्टापासून दूरच

परभणी जिल्ह्यात खरीप पीक कर्जवाटप उद्दिष्टापासून दूरच
परभणी जिल्ह्यात खरीप पीक कर्जवाटप उद्दिष्टापासून दूरच

परभणी : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२४ कोटी ७२ लाख रुपयांनी कमी खरीप पीककर्जाचे वाटप झाले. यंदा सलग दुसऱ्या वर्षी बॅंकाना पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती करता आली नाही. यंदाच्या खरीप हंगामात ५८ हजार २८६ शेतकऱ्यांना ३१५ कोटी ५५ लाख रुपये (२१.४६ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले.

एक एप्रिल ते ३० सप्टेंबर हा खरीप पीक कर्जवाटपाचा कालावधी मानला जातो. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना एकूण १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये व्यापारी बॅंकांना (राष्ट्रीयीकृत बॅंका) १ हजार २९ कोटी ६२ लाख रुपये, खासगी बॅंकांना ७५ कोटी २१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ कोटी ४७ लाख रुपयांच्या उद्दिष्टांचा समावेश होता.

यंदा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच सर्वच बॅंकाची पीक कर्जवाटपाची गती संथ राहिली. त्यामुळे यंदा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ११ हजार ४७६ शेतकऱ्यांना १०४ कोटी १८ लाख रुपये (१०.१२ टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ६६ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५ लाख रुपये (४२.६१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ११ हजार ४५७ शेतकऱ्यांना ७८ कोटी २८ लाख रुपये (३९.११ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ३३ हजार २८७ शेतकऱ्यांना १०१ कोटी ४ लाख रुपये (६१.०६ टक्के) असे एकूण ५८ हजार २८६ शेतकऱ्यांना ३१५ कोटी ५५ लाख रुपयांचे (२१.४६ टक्के) पीक कर्जवाटप केले.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही सलग दुसऱ्या वर्षी बॅंकांना पीक कर्जवाटपाचे उद्दिष्टे पूर्ण करता आले नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२४ कोटी ७२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप कमी झाले.  

पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

वर्षे  कर्जवाटप रक्कम शेतकरी संख्या  टक्केवारी
२०१८-१९ ४४०.२७ ८३३८५ ३०.०५ 
२०१९-२०  ३१५.५५   ५८२८६  २१.४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com