Agriculture news in Marathi, Not get money was sold seven months ago | Agrowon

सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे पैसे मिळेनात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात महिने होऊनही शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करीत असताना आठवडाभरात येतील एवढेच उत्तर ऐकायला मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की अकोट तालुक्यातील तरोडा येथील मनोहर महादेवराव साबळे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी अकोट येथील खरेदी केंद्रावर चार क्विंटल पाच किलो मूग विक्री केला होता. सहा हजार ९७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विक्री केलेल्या मुगाचे एकूण २८ हजार २४८ रुपये श्री. साबळे यांना शासनाकडून मिळायचे आहेत. 

मुगाची विक्री करून आता सात महीने उलटून गेले; पण शेतकऱ्याच्या खात्यात अजूनसुद्धा पैसे पोचलेले नाहीत. या शेतकऱ्याने अकोट येथे केंद्रावर आठ ते दहा वेळा चकरा मारल्या. बी-बियाणे खरेदीसाठी पैशांची गरज असताना हक्काचे पैसेच मिळत नसल्याने साबळे कंटाळले आहेत.

आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. सात महिन्यांपूर्वी नाफेडला मूग विकला होता; परंतु अजून पैसे मिळाले नाहीत. आता या वर्षी पेरणीसाठी पैसा कोठून आणायचा, शेती पडीक ठेवायची काय, असा प्रश्न पडला आहे.
- मनोहर साबळे, शेतकरी (तरोडा)

टॅग्स

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...