Agriculture news in marathi Not to lie, Aloy for sincere help: Thackeray | Page 2 ||| Agrowon

खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक मदतीसाठी आलोय : ठाकरे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही. पॅकेजचे पुढे काय होते, कुठे जाते आपणास माहित आहे. थोतांड, खोटे बोलण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो नाही. जे करणार ते प्रामाणिकपणे करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. 

भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार करीत नाही, तर नुकसानीचा अंदाज घेतोय. सरकार म्हणून सर्वांच्या हिताचे निर्णय घेऊ. मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही. पॅकेजचे पुढे काय होते, कुठे जाते आपणास माहित आहे. थोतांड, खोटे बोलण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो नाही. जे करणार ते प्रामाणिकपणे करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला आहे. जितकी शक्य आहे, तितकी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे वचन देतो,’’ असा विश्‍वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी भिलवंडी येथील पूरग्रस्त नागरिकांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडीत पूरस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. 

या वेळी आमदार मोहनराव कदम, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, आमदार अनिल बाबर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘महापुराने मोठे नुकसान झाले आहे. घरे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. काही ठिकाणी तर अंगावर शहारे आणणाऱ्या घटना घडल्या. सुमारे ४० लाख पूरग्रस्त स्थलांतरित झाले. कोरोना त्यानंतर, महापूर अशी संकटाची मालिका आली. अतिवृष्टी, पुराबाबत शासनाला पूर्वकल्पना आल्याने मोठे नुकसान टळले. या संकटातून मी मार्ग काढणारच.’’ 

या वेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्यशील माने, पोलिस महासंचालक मनोजकुमार लोहिया आदी उपस्थित होते. बी. डी. पाटील यांनी स्वागत केले. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

कठोर निर्णय, कायमस्वरूपी तोडग्याचे संकेत 
दर वर्षी महापूर, पुन्हा घरांचे नुकसान, आपल्या गावातून निर्वासितासारखे स्थलांतर हे कुठेतरी थांबले पाहिजे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे, असे सांगत ठाकरे यांनी पूरग्रस्तांना कायमस्वरूपी स्थलांतरासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. 

पूरग्रस्त गावांतील सरपंचांच्या मागण्या 
गाव शंभर टक्के पूरबाधित धरून सरसकट नुकसान भरपाई, पीककर्जाची माफी, घर व शेतीची वीजबिल माफी, पंचशील नगर, साठेनगर, साखरवाडी, मौलानानगर, या पूर पट्ट्यातील वस्त्यांचे कायमचे पुनर्वसन, कृष्णा नदीवर समांतर नवीन पूल, व्यापाऱ्यांसाठी मदत, आपत्कालीन विमा योजना, या मागणीचे निवेदन परिसरातील सरपंचानी दिले. 

पूर व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांची समिती 

पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. पूर नियंत्रणासाठी दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळविण्याचा सूचना देखील आल्या आहेत. वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल, केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पूरभागातील गावांसह सांगलीतील पूरपट्ट्याची पाहणी केली. नागरिकांशी चर्चा आणि काही संघटनांची निवेदनेही स्वीकारली. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘महापूर आपत्तीची वारंवारता पाहिली तर त्यांचे स्वरूप भीषण होते आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचताहेत, निसर्गासमोर हतबलता असते. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले. नदी पात्रातल्या पूर रेषेची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांना काय अर्थ आहे. पूरपट्टात अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. त्यात दरडग्रस्त ठिकाणांचाही समावेश असेल. पूरपट्यतील बांधकामे देखील नाइलाजाने दूर करावी लागतील. दोन गोष्टींवर आपल्याला काम करावे लागेल. आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत करणे सुरू झाले आहे. 

मुख्यमंत्र्यांसमोर भिडले सेना-भाजपचे कार्यकर्ते 

कृष्णा नदीच्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगलीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भाजप आणि शिवसेनेचे दोन गट घोषणाबाजी करत आमने-सामने आले. त्यामुळे झालेल्या गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीमार करावा लागला. येथील मुख्य पेठेत दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयर्विन पुलावरून कृष्णा नदीची पाहणी करून पेठेत आले. तेथे व्यापाऱ्यांसह भाजपचे काही लोक आणि विविध संघटना निवेदन देणार होते. पोलिसांनी दहा ते पंधरा संघटनांच्या प्रत्येकी पाच पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठीची मुभा दिली होती, त्यानुसार लोक जमले होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यानंतर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत गोंधळ वाढू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी गराडा घातला. त्याच वेळी गोंधळाला सुरुवात झाली.

भाजपने घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने ही घोषणाबाजी सुरू केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसावे लागले. अन्य संघटनांना निवेदन देता येणार नसल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...