Agriculture news in marathi; Not an onion order Reason is given in the postponement | Agrowon

धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश नाहीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या येवला तालुक्यात उशिराच्या पावसाच्या भिस्तीवर खरीप कांदा लागवडी झाल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. त्यात थोड्याफार लागवडी जगल्या. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागात काढणीला आलेल्या खरीप कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न होता टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. 

नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या येवला तालुक्यात उशिराच्या पावसाच्या भिस्तीवर खरीप कांदा लागवडी झाल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. त्यात थोड्याफार लागवडी जगल्या. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागात काढणीला आलेल्या खरीप कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न होता टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. 

जिल्ह्याच्या मुख्य पट्ट्यात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होते; परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी लांबणीवर गेल्या. त्यामुळे कांदा काढणी हंगाम लांबणीवर जाणार हे चित्र असताना पावसाने कांदा पीक धोक्यात आले आहे. पावसाचे पाणी कांद्याच्या वाफ्यांमध्ये अजूनही साचून राहिल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणावर कंद सडून गेले आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पादनापासून शेतकरी मुकणार आहे. 

येवला तालुक्यातील पूर्व भागात कोळगाव, ममदापूर या गावांमध्ये लाल कांदा अजूनही पाण्यात आहे. मात्र पंचमाने करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचमाने करताना कांदा पीक वगळले आहे. त्यांना याबाबत विचारले असताना पंचनाम्यासाठी मका पिकाचे सांगण्यात आले आहे. मात्र, कांदा पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे कर्मचारी सांगतात.

कांदा पंचनाम्यांचे आदेश नाहीत, आम्ही कांद्याचे पंचनामे करणार नाही. यानंतर पंचनामे करण्याची विनंती केल्यानंतर मक्याचे पंचनामे झाल्यानंतर करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अशी माहिती कोळगाव व ममदापूर परिसरातील कांदा उत्पादकांनी दिली. तातडीने पंचनामे करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी या परिसरातील कांदा उत्पादकांनी केली आहे. 

मनुष्यबळ कमी असल्याने कामकाजास दिरंगाई 
या भागात मका, कापूस, कांदा या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, हे सर्व पंचमाने करताना मर्यादित मनुष्यबळ आहे. त्यामुळे कामकाजात दिरंगाई होत असल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असता सांगण्यात आले. काही पंचमाने जर शिल्लक असतील तर तेही सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...