दुधात नफा नव्हे; उत्पादन खर्चातच पाच रुपये तोटा

नगर ः दूध व्यवसाय टिकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी संकटाने दूध व्यवसायाला सातत्याने अडचणीत आणले आहे. सहकार आणि साखर कारखान्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दूध उत्पादक नफा नव्हे; उत्पादन खर्चातच तोटा सोसत आहेत.
Not profit; Loss of five rupees in production cost
Not profit; Loss of five rupees in production cost

नगर ः दूध व्यवसाय टिकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी संकटाने दूध व्यवसायाला सातत्याने अडचणीत आणले आहे. सहकार आणि साखर कारखान्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दूध उत्पादक नफा नव्हे; उत्पादन खर्चातच तोटा सोसत आहेत. कोरोना संकटामुळे दुधाचे दर संघांनी कमी केलेले असताना खुराक, चाऱ्याचे दर मात्र दहा ते पंधरा टक्के वाढले आहेत. संकट काळातही तग धरण्याचा दूध उत्पादकांचा प्रयत्न असताना कोंडीत सापडलेले दूध उत्पादक नगर जिल्ह्यात तरी सर्व पातळीवर बेदखल झाल्याचे चित्र आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा धंदा करतात. शोधूनही रोजगार मिळाला नाही, असे अनेक तरुण शेतकरी बेरोजगारांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. मात्र, दूध उत्पादकांची दराबाबत कायमच हेळसांड झाली. कोरोनामुळे मागणी नसल्याचे कारण पुढे करत तीन महिन्यांपासून प्रतिलिटरला दहा ते बारा रुपये फटका सोसावा लागत आहेच; पण उत्पादन खर्चाचा विचार केला तर नफा नव्हे, प्रतिलिटरला पाच रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

जाहीर केलेले अनुदानही दिले नाही दुधाला दर मिळत नसल्याने दोन वर्षांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध आंदोलन पुकारले होते. यावेळी अन्य काही नेत्यांनाही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. संघटनेची आक्रमकता व प्रतिसाद पाहून सरकारने प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यातील २०१९ वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे प्रतिलिटर पाच रुपये व मार्च व एप्रिल महिन्यातील प्रतिलिटर तीन रुपये अनुदान अजूनही मिळाले नाही. काही दूध संकलकांनी स्वतःकडील अनुदानाचे पैसे दूध उत्पादकांना दिले. मात्र, अनेक उत्पादकांचे अनुदान मिळाले नाही. विशेष म्हणजे नेमके किती अनुदान रखडले आहे, याचा आकडा दुग्धविकास विभागाकडेही नाही. मात्र, हा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे.

मी दररोज पाच हजार लिटर दूध संकलन करतो. शेतकऱ्यांना सध्या दुधाला मिळणारा दर पाहता उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आहेत. त्यामुळे मी सकाळी संकलित केलेल्या दुधाला एक रुपया, तर सायंकाळी संकलित केलेल्या दुधाला दोन रुपये जास्तीचे देऊन खरेदी करत आहे. शेवटी अनेक वर्ष दूध उत्पादन घेणारा उत्पादक टिकला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. - विजय लांडगे, दूध संकलक, देहेरे, ता. नगर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com