Agriculture news in Marathi Notice to 651 farmers paying income tax | Agrowon

आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

 आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील ६५१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने घेतलेले अनुदान परत करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ६ कोटी १५ लाख आठ हजार अनुदान घेतल्याचे समजते.

शहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील ६५१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने घेतलेले अनुदान परत करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ६ कोटी १५ लाख आठ हजार अनुदान घेतल्याचे समजते.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. योजनेच्या निकषाप्रमाणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी येथील तहसील प्रशासनास प्राप्त झाली आहे. या यादीत नाव असलेली शेतकरी योजनेत पात्र नाहीत. शेतकऱ्यांनी घेतलेल्या रकमा परत करण्याविषयी गावोगावच्या तलाठ्यांना अपात्र शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. तलाठ्यांकडून अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात येत आहे. धनादेशाद्वारे तहसील कार्यालयात या रकमा जमा कराव्यात, अशी सूचना मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही ज्या लाभार्थ्यांना मानधन दिले, त्यांची नावे तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहेत. तलाठ्यांमार्फत या रक्कमेची वसुली सुरू आहे. संबंधितांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. अपात्र लाभार्थ्यांनी रक्कमेचा परतावा करावा. अन्यथा प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
- डॉ. मिलिंद कुलकर्णी,
तहसीलदार, शहादा, जि. नंदुरबार


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...