सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसा

सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसा
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसा

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध घालण्याऐवजी खासगी संस्थांना दूध घालणाऱ्या जिल्ह्यातील ६९५ संस्थांचे विसर्जन का करू नये, अशा आशयाच्या नोटीसा दुग्ध विकास विभागाचे सहायक निबंधक ए. ए. गावडे यांनी काढल्या आहेत. ४०८ संस्थांना लेखापरीक्षण करून घेण्याचे आदेशही दिले आहेत. अन्यथा, त्यांच्यावरही विसर्जनाची कारवाई केली जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती दूध संघाशी संलग्नित या सर्व संस्था आहेत. परंतु, या मध्यवर्ती संस्थेला सोडून या दूध संस्था खासगी दूध संकलन करणाऱ्या डेअरींना दूध घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मूळ उद्देशासाठी या संस्था चालत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. या संस्थांच्या उपविधीमध्ये मध्यवर्ती संस्थेला दूध घालण्याचा नियम आहे. परंतु, खासगी डेअऱ्या लिटरमागे एक ते दोन रुपये अधिक कमिशन देत असल्याने या संस्थांचा ओेढा खासगीकडे गेला. त्यामुळे या संस्थांमधील ''सहकार'' तत्त्व संपुष्टात आले, अशी निरीक्षणे सहकार खात्याने नोंदवली आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही. सहकार निवडणूक प्राधिकरण नियमानुसार निवडणुका नाहीत. नोंदणीच्या वेळी दिलेल्या ठिकाणावर संस्था दिसून येत नाही. उपविधीतील तरतुदीनुसार संस्थांचे कामकाज चालत नाही, आदी कारणे या कारवाईसाठी नोटीसीमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com