agriculture news in Marathi notice to agri inputs center which linking seeds Maharashtra | Agrowon

बियाणे लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राला नोटीस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बियाणे विक्रीत गोंधळ सुरू असल्याच्या बाबी समोर येत आहेत. सोयाबीन बियाण्यासोबत इतर बियाणे घेण्याची जबरदस्ती करण्याचे प्रकरण मंगळवारी (ता. ८) कृषी विभागाने केलेल्या कारवाईने समोर आणले. 

अकोला ः जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बियाणे विक्रीत गोंधळ सुरू असल्याच्या बाबी समोर येत आहेत. सोयाबीन बियाण्यासोबत इतर बियाणे घेण्याची जबरदस्ती करण्याचे प्रकरण मंगळवारी (ता. ८) कृषी विभागाने केलेल्या कारवाईने समोर आणले. या विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सोमवारी (ता. १४) त्याच्यावर अकोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

तेल्हारा येथील दधीमथी कृषी सेवा केंद्र संचालकाने ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशीचे बियाणे घ्यावेच लागेल, असा आग्रह केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन बियाणे हवे असतानाही ते न देता लिंकिंग करण्याचा प्रकार येथे केला जात होता. मंगळवारी रूपेश लासूरकर नावाच्या शेतकऱ्याने रीतसर तक्रार केल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा कारवाईसाठी पुढे आली.

अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा सोयाबीन बियाण्यासह कपाशीचे बियाणे विक्री केल्याच्या पावत्या दिसून आल्या. चौकशी केल्यानंतर याबाबत तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी सविस्तर अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला. या प्रकरणी जिल्हा कृषी विभागाने तातडीने या केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सोमवारी सुनावणीस बोलावले आहे. 

कापूस बियाणे विक्रीतही नियम मोडले 
प्री-मॉन्सून कपाशी लागवडीला पायबंद घालण्यासाठी ३१ मेपूर्वी बियाणे विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले आहेत. असे असतानाही तेल्हारा येथील कृषी केंद्रचालकांनी कपाशीचे बियाणे ३१ मेपूर्वी विक्री केले. ही बाब कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत आठवडाभरापूर्वीच समोर आलेली आहे. या प्रकरणात संबंधित विक्रेत्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. परंतु ही वेळ उलटून गेली तरी खुलासा मिळाला नसल्याचे समजते. आता लिंकिंग व कापूस बियाणे विक्री प्रकरणात एकत्रच १४ जून रोजी सुनावणी होणार असून, कारवाईची दिशा स्पष्ट होईल. 

कर्मचाऱ्यांची नेमणूक कागदोपत्रीच 
या हंगामात बियाणे, खत विक्री सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक कृषी केंद्रावर कृषी विभागाचा कर्मचारी नेमल्याचा दावा कृषी विभागाचे अधिकारी करीत आहेत. मात्र जिल्ह्यात जितके कृषी सेवा केंद्र आहेत, तेवढे कर्मचारीही या विभागाकडे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कृषी केंद्रावर नेमणुका कागदोपत्रीच झालेल्या असून, अनेक कर्मचारी आजपर्यंतही कृषी केंद्रांकडे फिरकलेले नाहीत. कर्मचाऱ्यांकडे आधीच हंगामातील कामांच्या विविध जबाबदाऱ्या आहेत. त्यात हे नवीन काम देण्यात आले होते. परिणामी, बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे. गेल्या आठवड्यात बाळापूर तालुक्यात वाडेगावमध्‍येही बियाणे विक्रीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. जिल्हाभर अशा तक्रारी समोर येत आहेत. परंतु ठोस कारवाई होत नसल्याने काही विक्रेते याचा फायदा उठवू लागले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...