एक हजारावर ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेची नोटीस

एक हजारावर ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेची नोटीस
एक हजारावर ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेची नोटीस

यवतमाळ : विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील १३६७  ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेबाबत नोटीस बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या सदस्यांना शेवटची संधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडता येणार आहे.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास नियमानुसार एक महिन्यात ते सादर करावे लागते. मात्र जिल्ह्यातील १३६७ उमेदवारांनी निवडणूक जिंकल्यानंतरही ते सादर केले नाही. या संदर्भाने त्यांना वारंवार कळविण्यात आले. परंतु त्याचीही त्यांनी दखल घेतली नाही. शेवटची संधी देखील त्यांनी सोडल्याने आता या सदस्यांना थेट अपात्र ठरविले जाणार असल्याची माहिती आहे.

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून तसा अध्यादेश ऑक्‍टोबर महिन्यात काढला होता. त्यानंतर आता जिल्हा निवडणूक आयोगाने कारवाईला सुरवात केली आहे. या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर सदस्यत्व रद्दचा निर्णय घेतला जाणार आहे. रिक्‍त जागेवर निवडणूक घेण्याची वेळ यानिमित्ताने प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

नोटीस पाठविलेले सदस्य (तालुकानिहाय)

उमरखेड    २०५
वणी  १८५
दारव्हा   १५६
पुसद    १२२
घाटंजी    १२०
यवतमाळ   ११०
महागाव ७१
दिग्रस ५६
राळेगाव  ५३
आर्णी   ४९
बाभूळगाव    ४५
केळापूर ४५
झरी    ४९
नेर    १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com