सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार अधिकाऱ्यांना नोटीसा

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या परीने ते त्यासाठी कामही करीत आहेत. पण कोरोनाचे आकडे काही केल्या कमी होत नाहीत, तर दुसरीकडून जिल्ह्यातूनही नाराजी व्यक्त होत आहे. या परिस्थितीत आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल वाढवण्याची आवश्यकता असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार विभाग प्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत.
Notice to four officers of Solapur Zilla Parishad

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी राऊत यांना या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तालुकानिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अन्य काही अधिकाऱ्यांनाही कोविड केअर सेंटरवरही नेमणूक दिली आहे. पण सोलापूरचे कोरोनाबाधितांचे आकडे सतत वाढत आहेत.

स्वतः श्री. वायचळ यांनी पुढाकार घेत स्वतःहून या अधिकाऱ्यांशी बोलून समन्वय ठेवून अडचणी जाणून घेणे गरजेचे आहे. नेमकी समस्या काय आहे, अडचण असेल तर मार्ग काय काढायचा, यावर विचार करण्यापेक्षा थेट अधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com