Agriculture news in Marathi Notice from the Human Rights Commission on the farmers' movement | Agrowon

मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून नोटीस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) केंद्रासह चार राज्यांना नोटीस पाठवून शेतकरी आंदोलनाबाबत काय कार्यवाही केली असल्याचा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेश सरकार आणि अन्य यंत्रणांनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) केंद्रासह चार राज्यांना नोटीस पाठवून शेतकरी आंदोलनाबाबत काय कार्यवाही केली असल्याचा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेश सरकार आणि अन्य यंत्रणांनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

शेतकरी आंदोलनाबाबत मानवाधिकार आयोगाकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत, असे मानवाधिकार आयोगाचे म्हणणे आहे. सोमवारी (ता. १३) याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये मानवाधिकार आयोगाने नमूद केले आहे, की शेतकरी आंदोलनाचा लघू, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील गर्दीमुळे नोकरदारांचा नियमित प्रवास प्रभावित झाला असून अपंग, रुग्णांची ने-आण करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच तसेच आयोगातर्फे उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान आणि दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू
दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर, सिंघू बॉर्डर, शाहजाहपूर बॉर्डर आदी राजधानी दिल्लीच्या सीमांवर शेकडो शेतकरी मागील नऊ महिन्यांपासून थंडी, ऊन्ह पावसात आंदोलन करीत आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही.


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...