जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल

जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल

पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन मोजणीच्या नोटिसा आता डिजिटल नोटीस बोर्डावर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे ‘आपली चावडी’वर शेतकऱ्यांना पारदर्शक माहिती मिळण्याची शक्यता आहे.  शेतकरी आपल्या गावची जमीन मोजणी नोटीस पाहण्यासाठी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi/ या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. ४४ हजार गावांचे प्रलंबित फेरफार त्याच्या तपशिलासह दर्शविणारी ई-फेरफारमधील फेरफाराची नमुना ९ ची नोटीस आता कोणत्याही शेतकऱ्याला पाहण्यासाठी येथे उपलब्ध आहे. तसेच, येथेच हरकत नोंदविण्यासाठी सुविधाही शेतकरी मोफत वापरू शकतात.  ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या सहकाऱ्यांकडून गेले काही दिवस या उपक्रमावर काम सुरू होते. गावचे तलाठी कार्यालय म्हणजेच ‘चावडी’ समजले जाते. या चावडीवर अनेक नोटिसा प्रसिद्ध होतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला चावडीवर नोटीस पाहायला मिळेलच याची हमी नव्हती. त्यामुळे शासनाने ई-महाभूमी प्रकल्पांतर्गत राबविलेल्या ई-फेरफार प्रकल्पाचा एक भाग म्हणून चावडीला डिजिटल नोटीस बोर्डाचे स्वरूप दिले आहे. मोजणी कर्मचाऱ्याचीही माहिती मिळणार आपली चावडी संकेतस्थळावर ई-मोजणी या भूमी अभिलेख विभागाच्या प्रणालीवर तयार होणारी प्रस्तावित जमीन मोजणीची नोटीस मोफत पाहण्यासाठी चाचण्या सुरू होत्या.  सात ऑगस्टपासून ही प्रणाली सुरू झाली. गावातील जमिनीची प्रस्तावित जमीन मोजणी नोटीस व कर्मचाऱ्याची माहितीदेखील यामुळे घरबसल्या मिळते आहे. “शेतकरी आता मोजणीचे सर्व्हेनंबर, मोजणीचा दिनांक, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर बांधावरच माहिती मिळवू शकतात. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता येईल,” असा दावा श्री. जगताप यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com