agriculture news in Marathi, notice of land calculation now digital, Maharashtra | Agrowon

जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन मोजणीच्या नोटिसा आता डिजिटल नोटीस बोर्डावर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे ‘आपली चावडी’वर शेतकऱ्यांना पारदर्शक माहिती मिळण्याची शक्यता आहे. 

पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन मोजणीच्या नोटिसा आता डिजिटल नोटीस बोर्डावर उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे ‘आपली चावडी’वर शेतकऱ्यांना पारदर्शक माहिती मिळण्याची शक्यता आहे. 

शेतकरी आपल्या गावची जमीन मोजणी नोटीस पाहण्यासाठी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi/ या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. ४४ हजार गावांचे प्रलंबित फेरफार त्याच्या तपशिलासह दर्शविणारी ई-फेरफारमधील फेरफाराची नमुना ९ ची नोटीस आता कोणत्याही शेतकऱ्याला पाहण्यासाठी येथे उपलब्ध आहे. तसेच, येथेच हरकत नोंदविण्यासाठी सुविधाही शेतकरी मोफत वापरू शकतात. 

ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या सहकाऱ्यांकडून गेले काही दिवस या उपक्रमावर काम सुरू होते. गावचे तलाठी कार्यालय म्हणजेच ‘चावडी’ समजले जाते. या चावडीवर अनेक नोटिसा प्रसिद्ध होतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला चावडीवर नोटीस पाहायला मिळेलच याची हमी नव्हती. त्यामुळे शासनाने ई-महाभूमी प्रकल्पांतर्गत राबविलेल्या ई-फेरफार प्रकल्पाचा एक भाग म्हणून चावडीला डिजिटल नोटीस बोर्डाचे स्वरूप दिले आहे.

मोजणी कर्मचाऱ्याचीही माहिती मिळणार
आपली चावडी संकेतस्थळावर ई-मोजणी या भूमी अभिलेख विभागाच्या प्रणालीवर तयार होणारी प्रस्तावित जमीन मोजणीची नोटीस मोफत पाहण्यासाठी चाचण्या सुरू होत्या.  सात ऑगस्टपासून ही प्रणाली सुरू झाली. गावातील जमिनीची प्रस्तावित जमीन मोजणी नोटीस व कर्मचाऱ्याची माहितीदेखील यामुळे घरबसल्या मिळते आहे. “शेतकरी आता मोजणीचे सर्व्हेनंबर, मोजणीचा दिनांक, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर बांधावरच माहिती मिळवू शकतात. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता व गतिमानता येईल,” असा दावा श्री. जगताप यांनी केला आहे.

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...