नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी ः माने

सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम २०२१ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपन्यांना द्यावी’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले.
Notice of loss insurance Give to companies: Mane
Notice of loss insurance Give to companies: Mane

सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम २०२१ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपन्यांना द्यावी’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले.  

स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. 

पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नुकसान झाल्यापासून ७२ तासांत विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे (Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका, जिल्हा कार्यालयात किंवा कृषी विभागास देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही माने यांनी केले.

इथे करा संपर्क   विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप,  संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ किंवा customer.services@bharatiaxa.com या ई-मेवर कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com