agriculture news in Marathi notice to nampur APMC Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री कामकाजात शेतकऱ्यांना अडचणी होत्या.

नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री कामकाजात शेतकऱ्यांना अडचणी होत्या. यात संचालकांनी हस्तक्षेप न केल्याने शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक नुकसान झाल्याने व कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी गुरुवारी (ता.२६) बरखास्तीची नोटीस बजावली. 

नामपूर बाजार समितीमध्ये काही नव्या व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीचा परवाना मंजूर करण्यात आला. दरात स्पर्धा व्हावी हा उद्देश असताना नव्या व्यापाऱ्यांना जुना व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे दिसून आले. त्यानुसार नव्या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे विरोध दाखवीत जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेऊन लिलाव बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत रस्ता रोकोही केला होता. तरीही बाजार समिती व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. 

शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असल्याने बाजार समितीत साडेसहाशे ते सातशे ट्रॅक्टर कांदा लिलावासाठी आले होते. मात्र या दिवशी अवघे दीडशे ट्रॅक्टरचा लिलाव झाला. तर बाकी वाहने तशीच राहिल्याचे चित्र होते. या दिवशी शेतकऱ्यांना किमान १५०० तर कमाल ४१०० रुपये दर मिळाला. मात्र शिल्लक ट्रॅक्टरचे लिलाव होऊ न शकल्याने शेतकऱ्यांना येथेच थांबून रात्र काढावी लागली होती. दुसऱ्या दिवशी लिलाव झाले. मात्र दरात काही अंशी घरसन होऊन शेतकऱ्यांना दरात फटका बसला.

मनमर्जी व दर पाडण्याचा प्रकार यावेळी घडला. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार या सर्व बाबींची दखल घेत कलम २९ नुसार कर्तव्यात कसूर केल्याचा संचालक मंडळावर ठपका ठेवून जिल्हा उपनिबंधकांनी गुरुवारी संचालक मंडळ बरखास्त करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बाजार समितीला बजावले आहे. 

कृषी व पणन कायद्यातील कलम २९ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली असून संचालकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे यावर मांडावे लागणार आहे. 

प्रतिक्रिया
बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठी व्यवस्था असायला हवी. शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित रहावेत. शेतमालाचा लिलाव पार पाडण्याची सर्व जबाबदारी संचालक मंडळाची असतानाही ती पूर्ण केली गेली नाही. ज्या कारणामुळे लिलाव बंद राहिले, आशा घटकांना नोटीस का दिली नाही, किंवा संबंधित कार्यवाही केली नाही, त्यामुळे बाजार समिती बरखास्त करण्याची नोटीस बजावली आहे. 
- सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक 

काही कुप्रथा बाजार समितीमध्ये आहेत. त्या मोडीत काढायला हव्यात, तरच शेतकऱ्यांच्या हिताचे कामकाज होऊ शकेल. ही सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापन व त्यानंतर प्रशासनाची असते. त्यामुळे असे प्रकार घडत असतील तर कारवाई योग्य आहे. शेतमाल विक्रीत स्पर्धा व्हायला हवी तरच बाजार समित्यांच्या कामाचा खरा अर्थ आहे. 
- सुनील पवार, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ 
 


इतर ताज्या घडामोडी
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...