Agriculture news in Marathi 'Notice Pay Notice' to Ashish Mishra | Page 2 ||| Agrowon

लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस पे नोटीस’ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

येथील हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना नोटीस बजावतानाच शनिवारी अकरापर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्राला नोटीस बजावतानाच शनिवारी अकरापर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

आशिष यांना आज सकाळी दहा वाजेपर्यंत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते, पण त्यांनी या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. यानंतर अजय मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘आशिष उद्या (ता. ९) पोलिसांसमोर उपस्थित राहील त्यानंतर तो आपला जबाब आणि पुरावे देखील सादर करेल. तो निष्पाप आहे.’’ दुसरीकडे पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पुन्हा अजय मिश्रा यांच्या घराबाहेर नोटीस लावली असून, त्यात त्यांना उद्यापर्यंत चौकशीला सामोरे न गेल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

आशिष यांनी याआधीच्या पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला उत्तर दिले नव्हते, त्यामुळे ते नेपाळमध्ये पळून गेल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मिश्रा यांना नेपाळमध्ये पळून जाण्यापासून रोखायचे असेल तर तातडीने अटक करावी, असे म्हटले होते. 

किसान मोर्चा म्हणतो.. हे धक्कादायक 
संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आशिष मिश्रा यांचा थांगपत्ता लागलेला नाही. वृत्तावाहिन्यांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या पाहिल्या तर ते त्यांचे ठिकाण बदलत असल्याचे दिसून येते. सध्या ते फरार असून उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेते आहे. मिश्रा यांना आतापर्यंत अटक होत नसेल तर ते धक्कादायक आहे.

आमचा कायद्यावर पूर्ण विश्‍वास असून माझा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे. त्याला गुरुवारीच नोटीस मिळाली होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीला उपस्थित राहता आले नाही. तो उद्या (ता. ९) चौकशीला सामोरा जाईल. 
- अजय मिश्रा, केंद्रीय गृहराज्यमंत्री 
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...