agriculture news in Marathi, notice for state regarding HTBT sowing, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी लागवडप्रकरणी केंद्राची राज्याला नोटीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे तसेच जीएम बियाण्यांची लागवड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच आठवड्यात जिल्हयात अकोली जहाँगीर येथे अशा बियाण्याची जाहीर लागवड झाली आहे. याची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली असून, राज्याला तातडीने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देत तातडीने खुलासा मागितला आहे.

अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे तसेच जीएम बियाण्यांची लागवड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच आठवड्यात जिल्हयात अकोली जहाँगीर येथे अशा बियाण्याची जाहीर लागवड झाली आहे. याची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली असून, राज्याला तातडीने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देत तातडीने खुलासा मागितला आहे.

अकोली जहाँगीर येथे शेतकरी संघटनेचे एचटीबीटी कापूस बियाणे व जीएम वांग्यांची लागवड करण्याची घोषणा केली होती. ठरल्याप्रमाणे या ठिकाणी बीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. यामुळे देशभरात खळबळ उडाली. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पत्र लिहिले. देशात आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र तसेच पंजाबमध्ये अशा प्रतिबंधित बियाण्यांची लागवड केल्याचे समोर आले आहे. 

सोमवारी (ता. १०) अकोली जहाँगीर येथे या बियाण्याची लागवड झाली. याबाबत राजेश क्रिष्णन यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अकोली येथील घटनेची चौकशी करावी. बियाण्याची तपासणी करून यापुढे प्रतिबंधित बियाणे लागवड रोखण्यासाठी कारवाई करावी. त्याचा अहवाल केंद्राला सादर करावा, असे सचिवांना सुचविले आहे. 

जिल्ह्याचा शासनाला अहवाल
अकोली येथे शेतकरी संघटनेने घेतलेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र भंडारा कार्यक्रमातील एचटीबीटी बियाणे लागवडीचा सविस्तर अहवाल जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी संघटनेद्वारे एचटीबीटी कापूस बियाणे लागवड झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए. जी. वाघमारे, भरारी पथक प्रमुख एम.बी. इंगळे, मोहीम अधिकारी एम.डी. जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एन. एस. लोखंडे यांनी कार्यक्रमस्थळी ललीत बहाळे यांच्या शेतात हे बियाणे न पेरण्याबाबत संघटनेला कळविले होते. तरीही ज्या बियाण्याची लागवड करण्याचा प्रयत्न झाला ते बियाणे संकलित करून त्याचा नमुना तपासणीसाठी नागपूर येथे सीआयसीआरच्या प्रयोगशाळेत पाठवला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविले आहे.


इतर अॅग्रो विशेष
अप्रमाणित बियाण्यांबाबत न्यायालयात दावे...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...
जिल्हा बॅंकांनी ठोठावला राज्य बॅंकेचा...सोलापूर : ‘कोरोना’मुळे अडचणीत सापडलेल्या...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
सांगली जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र...सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणारपुणे  : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक...
जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
मराठवाड्यात पीककर्ज पुरवठ्याचं घोडं...औरंगाबाद  : कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना कर्ज...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...