agriculture news in Marathi, notice for state regarding HTBT sowing, Maharashtra | Page 4 ||| Agrowon

अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी लागवडप्रकरणी केंद्राची राज्याला नोटीस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे तसेच जीएम बियाण्यांची लागवड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच आठवड्यात जिल्हयात अकोली जहाँगीर येथे अशा बियाण्याची जाहीर लागवड झाली आहे. याची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली असून, राज्याला तातडीने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देत तातडीने खुलासा मागितला आहे.

अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे तसेच जीएम बियाण्यांची लागवड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच आठवड्यात जिल्हयात अकोली जहाँगीर येथे अशा बियाण्याची जाहीर लागवड झाली आहे. याची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली असून, राज्याला तातडीने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देत तातडीने खुलासा मागितला आहे.

अकोली जहाँगीर येथे शेतकरी संघटनेचे एचटीबीटी कापूस बियाणे व जीएम वांग्यांची लागवड करण्याची घोषणा केली होती. ठरल्याप्रमाणे या ठिकाणी बीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. यामुळे देशभरात खळबळ उडाली. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पत्र लिहिले. देशात आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र तसेच पंजाबमध्ये अशा प्रतिबंधित बियाण्यांची लागवड केल्याचे समोर आले आहे. 

सोमवारी (ता. १०) अकोली जहाँगीर येथे या बियाण्याची लागवड झाली. याबाबत राजेश क्रिष्णन यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अकोली येथील घटनेची चौकशी करावी. बियाण्याची तपासणी करून यापुढे प्रतिबंधित बियाणे लागवड रोखण्यासाठी कारवाई करावी. त्याचा अहवाल केंद्राला सादर करावा, असे सचिवांना सुचविले आहे. 

जिल्ह्याचा शासनाला अहवाल
अकोली येथे शेतकरी संघटनेने घेतलेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र भंडारा कार्यक्रमातील एचटीबीटी बियाणे लागवडीचा सविस्तर अहवाल जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी संघटनेद्वारे एचटीबीटी कापूस बियाणे लागवड झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए. जी. वाघमारे, भरारी पथक प्रमुख एम.बी. इंगळे, मोहीम अधिकारी एम.डी. जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एन. एस. लोखंडे यांनी कार्यक्रमस्थळी ललीत बहाळे यांच्या शेतात हे बियाणे न पेरण्याबाबत संघटनेला कळविले होते. तरीही ज्या बियाण्याची लागवड करण्याचा प्रयत्न झाला ते बियाणे संकलित करून त्याचा नमुना तपासणीसाठी नागपूर येथे सीआयसीआरच्या प्रयोगशाळेत पाठवला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविले आहे.

इतर अॅग्रो विशेष
हिवरेबाजारने मांडला तब्बल पंचविसावा...नगर ः राज्यातच नव्हे तर देशात जलसंधारणाच्या...
एच.टी. कापूस बियाणे समितीचा अहवाल अंतिम...नागपूर ः राज्यात अनधिकृतपणे लागवड होणाऱ्या एच.टी...
नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला...नाशिक : लाखलगाव येथील कांदा व्यापाऱ्यास दोन कोटी...
खते, बियाणे कंपन्यांना पुन्हा को-...पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी मार्केटिंग...
कांदा उत्पादक म्हणतात ‘आमचं ठरलंय...’नाशिक : केंद्र सरकारच्या निर्बंधांनंतर ‘आम्ही...
सांगलीत कांदा मार्केट मंगळवारी बंदसांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे : अरबी समुद्र, कर्नाटक आणि दक्षिण...
दुष्काळी लाभार्थींचा निधी बॅंकांनी...जळगाव ः जिल्ह्यात २०१८मधील दुष्काळासंबंधीचा निधी...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे  ः राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह...
राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये...नांदेड, परभणीत ३१५० ते ३४५० रुपयांचा दर नांदेड...
‘नदी जोड’चे वास्तवदेशात नदी जोड प्रकल्पाची चर्चा मागील चार...
पुन्हा एकदा नव महाबळेश्‍वर प्रकल्प!निसर्ग पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच...
कृत्रिम पावसासाठी पाच वेळा बीजारोपणऔरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या...
नफा देणारी पीकपध्दती, विक्रीकौशल्य अन...यवतमाळ शहरापासून चार किलोमीटवरील पारवा येथील...
‘मिशन मोड’वर हवंय सूक्ष्म सिंचन धोरणकेंद्र आणि राज्य शासनाकडून अलीकडच्या काळात...
नागनाथ जातो, सापनाथ सत्तेवर येतो...या  वर्षी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍नच...
तालुकानिहाय मूल्यवर्धन साखळीचे आराखडे...राज्यातील शेती आणि शेतकरी संक्रमणावस्थेतून जात...
मराठवाड्याचे मका हब लष्करी अळीकडून...औरंगाबाद : खरिपात उत्पादन व चारा पीक म्हणून...
कांदा आवक रोडावलेलीच; शेतकऱ्यांचा रोष...नाशिक  : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...