समृद्धीसाठीची अधिसूचना पुढील अाठवड्यात

समृद्धीसाठीची अधिसूचना पुढील अाठवड्यात
समृद्धीसाठीची अधिसूचना पुढील अाठवड्यात

नाशिक  : समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के जमीन संपादित झाली आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांचे अंतर्गतवाद, न्यायालयीन वाद मिटण्याच्या स्थितीत नसल्याने आता या जमिनी सक्तीच्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित केल्या जाणार आहेत.

पहिली अधिसूचना महिनाभरापूर्वीच जाहीर करण्यात आली अाहे. अंतिम अधिसूचनाही पुढील आठवडाभरात जाहीर होईल. त्यानंतर पुरस्कारही जाहीर हाेणार असल्याने शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळेल. अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी खरेदी झाल्यास पाचपट दराने लाभ देता येणार असल्याचे समृद्धीचे समन्वयक उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले.

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून अोळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे अर्थात समृद्धी कॉरिडॉरचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग राज्यातील १० जिल्ह्यांसह सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांतून जातो. हे अंतर १०० किमी आहे. त्यासाठी जिल्ह्यात साडेबाराशे हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ७५० हेक्टर जमीन संपादित झाली आहे. शासकीय जमीन वेगळी असून, ८० टक्के जमीन प्रशासनाच्या ताब्यात आहे. परंतु काम सुरू करण्यासाठी अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन बाकी आहे.

सिन्नरमधील २०० हेक्टर आणि इगतपुरीतील १०० हेक्टर अशी ३०० हेक्टर जमीन संपादनाची प्रतीक्षा आहे. यासाठी प्रशासनाने गत महिन्यात थेट भूसंपादन कायद्याने संपादित करण्याबाबत प्रथम अधिसूचना काढली. अंतिम अधिसूचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील सिन्नरची अधिसूचना अाठ ते दहा दिवसांत निघणार आहे. इगतपुरीतील पेसा क्षेत्रात नसलेल्या पाच गावांचीही अधिसूचना या वेळीच निघेल. ही पाच गावे वगळून पेसा क्षेत्रातील गावांची अधिसूचना महिनाभरात निघेल. तोपर्यंत थेट खरेदीने संपादन सुरूच राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com