अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
अॅग्रोमनी
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी
निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना सेसीड्यू फ्री भाजीपाला उपलब्ध व्हावा याकरिता ‘व्हेजनेट’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना सेसीड्यू फ्री भाजीपाला उपलब्ध व्हावा याकरिता ‘व्हेजनेट’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरुवातीला ‘व्हेजनेट’वर भेंडी, मिरची या दोनच पिकांची नोंदणी शक्य होत होती. परंतु आता ‘अपेडा’कडून यात भाजीपालावर्गीय ४३ पिकांचा समावेश करण्यात आला असून, या माध्यमातून कीडनाशकअंशरहित भाजीपाला उत्पादकांचा डाटाबेस उपलब्ध होण्यास मदत होणार होईल, अशी माहिती ‘पणन’ तज्ज्ञांनी दिली.
भाजीपाला उत्पादनात पहिल्या क्रमांकावर चीन तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. त्यामुळे निर्यातीच्या संधीदेखील तितक्या असल्या, तरी स्थानिकस्तरावरीलच मागणी अधिक असल्याने अद्याप निर्यातीकरिता अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. नजीकच्या काळात मात्र शेती क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढला आणि त्यांच्याकडून रेसीड्यू फ्री किंवा निर्यातीसाठी देशनिहाय निश्चित कीडनाशक मर्यादेत शेतीमालाचे उत्पादन होत आहे. केंद्र सरकारने देखील सुरक्षित अन्न पिकवा अभियानाच्या माध्यमातून या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच प्रयत्नांतर्गत भाजीपाला निर्यातीला चालना मिळावी याकरिता व्हेजनेटवर भाजीपाला पिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
सुरुवातीला महाराष्ट्रातील प्रमुख भाजीपाला उत्पादक १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाच ‘व्हेजनेट’चा पर्याय उपलब्ध होता. टप्प्याटप्प्याने पोर्टलवर नोंदणीसाठी जिल्ह्यांची संख्या वाढविण्यात आली. आता राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी ‘व्हेजनेट’चा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नोंदणीसाठीच्या पिकांची संख्या सुरुवातीला दोन, त्यानंतर १४ वरुन आता थेट ४३ केली आहे.
राज्यातील १७०० शेतकऱ्यांची नोंदणी
‘व्हेजनेट’मध्ये देशभरातील १९०० शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. त्यापैकी १७०० शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. भंडारा, सातारा, नंदूरबार, जळगाव, ठाणे, बीड, औरंगाबाद हे जिल्हे नोंदणीमध्ये आघाडीवर आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय नोंदणी
भंडारा ः १५६
गोंदिया ः चार
चंद्रपूर ः ०००
ठाणे ः २३१
जळगाव ः २०५
धुळे ः १०३
सातारा ः ३००
पुणे ः १२५
सोलापूर ः ७०
बीड ः ११०
पालघर ः ७०
नाशिक ः २७
प्रतिक्रिया
‘व्हेजनेट’चा पर्याय संपूर्ण राज्याकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच पिकांची संख्या १४ वरून आता ४३ केली आहे. काकडी, गाजर, आले, हळद, टोमॅटो ही पिके महाराष्ट्रासाठी मुख्य आहेत. शेतकऱ्यांमध्ये माहितीचा प्रसार होत असल्याने ‘व्हेजनेट’वरील नोंदणीकृत बागांची संख्या वाढती आहे.
- गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, निर्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
- 1 of 30
- ››