agriculture news in Marathi, now advt for fee return from agriculture department, Maharashtra | Agrowon

कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी आता जाहिरात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात लाख रुपये येणार आहे. त्याची दखल घेत आता वृत्तपत्रात जाहिरात देऊन शुल्क नेण्याचे आवाहन कृषी विभाग करणार आहे. यासंबंधी ॲग्रोवनने शनिवारी (ता. २०) वृत्त प्रकाशित केले होते.

अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात लाख रुपये येणार आहे. त्याची दखल घेत आता वृत्तपत्रात जाहिरात देऊन शुल्क नेण्याचे आवाहन कृषी विभाग करणार आहे. यासंबंधी ॲग्रोवनने शनिवारी (ता. २०) वृत्त प्रकाशित केले होते.

 अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांकरिता पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. गट- ड मधील शिपाई, रोपमळा मदतनीस अशी पदे याव्दारे भरण्याचे प्रस्तावीत होते. १ जानेवारी २०१४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्याला उमेदवारांचा व्यापक प्रतिसादही मिळाला. सुमारे ३५ लाख रुपयांचे शुल्क या माध्यमातून गोळा झाले. मात्र २५ एप्रिल २०१८ रोजी ही भरती रद्द ठरविण्यात आली. 

परंतु, त्यानंतरही शुल्क परतीसंदर्भाने कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. तेव्हापासून शुल्कापोटी जमा ३५ लाख रुपयांचा निधी कृषी विभागाकडेच पडून आहे. त्यावरील व्याजही त्यांना मिळाल्याची माहिती परभणी येथील रवीचंद्र काळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मिळविली. त्यानंतर त्यांनी शुल्क परतीसंदर्भाने पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत कृषी विभागाने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देत आवाहन केले. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर पोस्टाव्दारे शुल्क परतीचा विचार करण्यात आला. त्या वेळी एका जिल्ह्याचा पोस्टेजवरील खर्च सुमारे सात लाख रुपये असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा विचार सोडून देत आता नव्याने राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात देत शुल्क परतीचे आवाहन केले जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...