agriculture news in marathi, Now discussion only on POK : Rajnathsingh | Page 2 ||| Agrowon

आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर : संरक्षणमंत्री राजनाथसिंहांनी पाकिस्तानला सुनावले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत.

हरियाणामध्ये रविवारी (ता.१८) आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. राजनाथ म्हणाले की, पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल.

काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत.

हरियाणामध्ये रविवारी (ता.१८) आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. राजनाथ म्हणाले की, पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल.

पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.

इम्रान यांच्यावर निशाणा
राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शासन निर्णय असूनही बँकानी पीकविमा रोखला...बुलडाणा ः गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजार...यवतमाळ ः खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना...
नागपूर, गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या...
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी...औरंगाबाद : कायम दुष्काळ व पाणीतुटीचा सामना...
टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या...मुंबई : राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील...
खरिपासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करा...मुंबई : येत्या खरीप हंगामासाठी बँकांनी...
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
बुलडाण्यात ३० हजारांवर शेतकऱ्यांचे आधार...बुलडाणा  : राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १००० ते १३०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...