agriculture news in Marathi now farmers will fill up crop info Maharashtra | Agrowon

आता शेतकरीच करणार पीकपाहणी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पीकपेऱ्याच्या नोंदी करणे अपेक्षित असताना राज्यात बहुतेक गावांमध्ये कागदोपत्रीच पीकनोंदी होतात.

पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पीकपेऱ्याच्या नोंदी करणे अपेक्षित असताना राज्यात बहुतेक गावांमध्ये कागदोपत्रीच पीकनोंदी होतात. यामुळे शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी आता मोबाईलच्या माध्यमातून ई-पीक पाहणीचा पर्याय स्वीकारला जाण्याची चिन्हे आहेत. 

सातबारा उताऱ्यावरील पीकाची नोंद ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. या नोंदीशिवाय शेतकऱ्याला कर्ज, अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळत नाही. विशेष म्हणजे ई-पीक पाहणी उपक्रमात शेतकरी स्वतः आपल्या शेताभोवती फिरून मोबाईल ‘ॲप’द्वारे पीकपेऱ्याची माहिती अपलोड करणार आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीने या उपक्रमाच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. संबंधित तालुक्यांमधील तहसीलदारांच्या मदतीने आता महसूल विभागाने चाचण्यांचा सविस्तर अभ्यास सुरू केला आहे. 

मोबाईलच्या ‘अॅप’वर शेतकऱ्यांनी घेतलेली निरीक्षणे थेट गाव नमुना नंबर बारावर नोंदवली जाणार आहेत. विविध तालुक्यांमधील पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शासनाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या उपक्रमात महसूल व कृषी विभाग संयुक्तरीत्या काही कामे करणार आहे. नेमके कोणी काय करायचे याविषयी जबाबदाऱ्या अजून निश्‍चित झालेल्या नाहीत. 

हा प्रकल्प राज्यभर लागू केल्यानंतर शेतकरी वर्गाने आपला पीक पेरा स्वतःहून अपलोड करणे अपेक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काय उपाय करावे लागतील, स्मार्ट फोन नसलेल्या शेतकऱ्यांचे काय, पीक पेऱ्याच्या नोंदी फोटोशिवाय की फोटो व्यतिरिक्त स्वीकाराव्यात, मोबाईलवरून घेतलेल्या फोटोने नेमके पीक ओळखता येते का, अशी माहिती राज्यातील तहसीलदारांकडून घेतली जात आहे. 

तलाठ्यांचे अधिकार कायम 
बीडमधील एका तहसीलदाराच्या म्हणण्यानुसार ‘‘मोबाईलच्या माध्यमातून ई-पीक पाहणी शेतकरी करणार असले तरी त्यांनी अपलोड केलेली माहिती योग्य की अयोग्य हे तलाठीच ठरवणार आहेत. तलाठ्यांचे अधिकार आम्ही कायम ठेवणार आहोत. तलाठ्याने मान्यता दिल्याशिवाय शेतकऱ्याने अपलोड केलेल्या माहितीची सत्यता गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मोबाईलवर अपलोड केलेली पीक पाहणीची माहिती पडताळतांना व ती अंतिम करताना तलाठ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली जात आहे.’’ 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...