agriculture news in Marathi, now FRP condition for crushing licence , Maharashtra | Agrowon

गाळप परवान्यासाठी आता 'एफआरपी'ची अट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळवण्यासाठी आता एफआरपीची अट देखील पाळावी लागणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धाडसी निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळवण्यासाठी आता एफआरपीची अट देखील पाळावी लागणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धाडसी निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  

‘महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण, गाळप नियमन व ऊसपुरवठा कायदा १९८४’ मधील तरतुदींचा आधार घेत साखर आयुक्त गाळप परवाना देतात. गाळप परवाना असल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला धुराडी पेटवता येत नाही. विविध अटी असलेल्या करारनामा केल्यानंतरच प्रत्येक कारखान्याला परवाना मिळतो. करारनाम्यात आधी एफआरपीची अट नव्हती. अर्थात, राज्याच्या ऊसपुरवठा कायद्यात या अटीचा उल्लेख नाही. मात्र, साखर आयुक्तालयाला ही अट टाकणे महत्त्वाचे वाटत होते. त्यासाठी आयुक्तांनीच तोडगा काढला. 

“ऊस नियंत्रण आदेश १९६६मध्ये साखर आयुक्तांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. आयुक्तांना स्वतःच्या कक्षेत हितकारक नियम करता येतील, असे आदेशात नमूद केलेले आहे. याच तरतुदीचा आधार घेत साखर आयुक्तांनी स्वतःचे अधिकार वापरून एफआरपीची अट करारनाम्यात आणली आहे. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करताना या अटीचा उपयोग होऊ शकतो. अट भंग झाल्याचा मुद्दा न्यायालयीन युक्तिवादाच्या वेळी करण्याचा पर्याय यातून मिळेल,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांना १४ दिवसांत एफआरपीचे पेमेंट न केल्यास प्रतिवर्षी १५ टक्के व्याज द्यावे लागेल,’’ असे या अटीत म्हटलेले आहे. ‘‘एफआरपी व आरएसएफ (महसुली विभागणी सूत्र) पेमेंट रोखीत न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करावे,’’ असे दुसऱ्या अटीत नमूद केले गेले आहे.  एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांनी गेल्या हंगामापासून जोरदार पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हजार ५५७ कोटी रुपये मिळाले आहेत. सध्या केवळ तीन टक्के एफआरपी थकीत असली, तरी आयुक्तांनी कारखान्यांचा पिच्छा सोडलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...