Agriculture news in Marathi, Now in the Kolhapur district, on the rabbi season | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात आता भिस्त रब्बी हंगामावर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता बुडलेली बहुतांशी पिके खराब झालेली आहेत. परिणामी आता शेतकरी नव्याने रब्बीतच पिकांची लागवड करतील, अशी शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता बुडलेली बहुतांशी पिके खराब झालेली आहेत. परिणामी आता शेतकरी नव्याने रब्बीतच पिकांची लागवड करतील, अशी शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक हेक्‍टर क्षेत्र भाताचे आहे, तर दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर तोडणीबरोबरच विविध कालावधीचा ऊस आहे. पुरामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले. पूर ओसल्यानंतर जिल्ह्यात आता पूरबाधित नव्वद टक्क्यांहून अधिक शिवारातून पाणी हटले आहे. नद्या पात्रात गेल्याने सगळी शेती मोकळी झाली आहे. पूर ओसल्यानंतर चार पाच दिवस कडक ऊन पडल्याने शिवारातील पाणी वेगाने हटले. अद्यापही अपवाद वगळता कोणत्याच शिवारात शेतकरी जात नसल्याचे चित्र आहे.

शेतातील कचरा दूर करून पूर्ण खराब पीक झाल्यास ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण अजूनही पंचनाम्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी शेत स्वच्छ करण्यासाठी फार उत्सुकता दाखविली नाही. सध्या जुलै महिन्यात लागवड केलेला आडसाली ऊस पूर्ण खराब झालेला आहे. अनेक शेतात फक्त मातीच उरली आहे. तर दोन तीन महिन्यांचा ऊस गाळाने भरलेला आहे. तो सगळा काढून टाकणे गरजेचे असल्याने शेतकरी येत्या काही दिवसांत खराब पीक काढून दुसऱ्या पिकाची पुर्नलागवड करतील, अशी शक्‍यता आहे. 

आता पुन्हा उसाची लागवड करण्यासाठी किमान एक महिना कालावधी लागणार आहे. परत शेत नांगरून तयार करण्यासाठी वाफसा येणे गरजेचे आहे. पूर्ण सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस येण्याची शक्‍यता असल्याने सध्या दुसरे पीक करणार नाहीत, अशी शक्‍यता कृषी विभागाबरोबर शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  सध्या शेतकऱ्यांकडे आर्थिक चणचण आहे. कर्जमाफीबाबतही स्पष्ट धोरण अथवा ती रक्कम तातडीने माफ होईल ती किती होईल याबाबत शाश्‍वती नसल्याने सावध भूमिका घेतल्या आहे.

बियाणे उपलब्धतेचे आव्हान
ऊस लागवड करायची म्हटली तरी नवे बियाणे मिळविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. आता पूर नसलेल्या भागातील ऊस बियाण्यांसाठी घेणे गरजेचे बनले आहे. कारखाना पातळीवरही याबाबत अद्याप शांतताच दिसून येत आहे. नुकसान किती झालेय हे पाहून शेतकऱ्यांना कशाची मदत लागेल, याबाबत निर्णय घेणार असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...