agriculture news in Marathi, Now option for pruning of foreign citrus pruning machine, Maharashtra | Agrowon

संत्रा छाटणीकरिता आता विदेशी सयंत्राचा पर्याय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

एका गावात शेतकरी समूहांनी याचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. एका गावात किमान २० ते २५ एकर क्षेत्र असावे. सयंत्राद्वारे एका दिवसात चार ते पाच एकर क्षेत्रातील झाडांची छाटणी होते. डिझेलचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सयंत्रासाठी प्रती एकर २ हजार रुपये ना परतावा धोरणानुसार एकरी जमा करावे लागणार आहेत.
- डॉ. डी. एम. पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता, नागपूर कृषी महाविद्यालय.

नागपूर ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयासह विदर्भातील तीन केंद्रांना संत्रा छाटणी सयंत्राकरिता निधी मंजूर झाला आहे. यातील इटली बनावटीचे पहिले सयंत्र नागपूर कृषी महाविद्यालयात दाखल झाले असून, अमरावती आणि अचलपूर येथील केंद्राकरिता लवकरच उर्वरित दोन सयंत्राशी उपलब्धता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

संत्रा झाडांच्या छाटणीमुळे समान आकाराची फळधारणा होते. त्यासोबतच फळांचा दर्जा सुधारतो, ए ग्रेडची फळे अधिक मिळण्यास मदत होते. फळांचा दर्जा सुधारल्याने अशा फळांना दोन ते अडीच पटीने अधिक दर मिळतो त्यासोबतच उत्पादनातही वाढ होते, असे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले. छाटणीमुळे मधल्या भागातील फांद्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत हीच बाब झाडांच्या आणि फळांच्या पोषक वाढीस पूरक ठरते, असे निरीक्षण आहे. नवीन पालवीचे महत्त्व संत्रा उत्पादनात अधिक राहते. झाडाला नवीन पालवी फुटण्याचे प्रमाणही यामुळे वाढत असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले. 

छाटणी न केल्यास शेंड्याकडे फळे लागतात. त्याचा दर्जाही योग्य राहत नाही. त्यासोबतच झाडाला बांबूचा आधार द्यावा लागतो. काही शेतकरी मजुरांमार्फत हे काम करीत होते. परंतु एका दिवसात एका मजुराला केवळ दोन झाडांची छाटणीच शक्‍य होत होती. परिणामी, हे खर्चीक ठरत असल्याने अनेकांचा छाटणी टाळण्याकडेच अधिक भर होता. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडे सध्या एक सयंत्र आहे. परंतु त्याला मागणी अधिक आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाने तीन सयंत्रांचा प्रस्ताव राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून दिला होता. अभियानातून प्रत्येक सयंत्रांकरिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 

या काळात करावी छाटणी
ऑक्‍टोबरमध्ये आंबिया बहरातील फळे निघाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये छाटणी फायद्याची ठरते. मृगाची फळे एप्रिलमध्ये तोडणी होतात त्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक तीव्र असल्याने त्या वेळी छाटणी करू नये, अशी शिफारस विद्यापीठाने केली आहे. मृगाकरिता जूनच्या पहिल्या आठवड्यात छाटणी फायद्याची ठरते, असे नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...