पुणे जिल्ह्यात तूर्तास टाळेबंदी नाही ः पवार

पुणे ः ‘‘शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाने देखील नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तूर्तास तरी टाळेबंदी करणार नाही. मात्र नागरिकांनी सहकार्य न केल्यास एप्रिलमध्ये टाळेबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागेल,’’ असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
 now in Pune district No lockout: Pawar
now in Pune district No lockout: Pawar

पुणे ः ‘‘शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाने देखील नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तूर्तास तरी टाळेबंदी करणार नाही. मात्र नागरिकांनी सहकार्य न केल्यास एप्रिलमध्ये टाळेबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागेल,’’ असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

पुणे शहर व जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२६) आढावा बैठक घेतली. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, वन राज्यमंत्री दत्ता भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘पुण्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. लसीकरणाचे प्रमाण दुप्पट केले जाणार आहे. ’’

एक एप्रिलपासून कडक कारवाई 

पवार म्हणाले, ‘‘पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने पुण्यात रुग्ण सापडत आहेत. रात्रीच्या संचारबंदीचे पालन केले नाही, तर एक एप्रिलपासून कडक कारवाई करण्यात येईल. शाळा, महाविद्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येतील. उद्याने सकाळीच व्यायामासाठी सुरू राहतील. मॉल, चित्रपट गृहे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com