agriculture news in Marathi, Now there is a waiting list of wheat wheat | Agrowon

आता उरली गव्हाच्या काडावर आस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

नागपूर ः ‘‘व्होल्टेज रायत नाई असं ग्रामपंचायतीचे लोक सांगतात. म्हणून जनावराले पाणी भेटाची बी सोय नाही. जंगलात आता चारा नाई मनून गहू सोंगून उरलेल्या तणसावरच त्यायच पोट भराव लागते. त्याच्यासाठी बी लय दूर जा लागते. अन पाण्यासाठी डबल गावात या लागते’’, अशा शब्दांत जनावर चारणाऱ्या मधुकर पोहरे या पशुपालकाने आपली व्यथा मांडली.

नागपूर ः ‘‘व्होल्टेज रायत नाई असं ग्रामपंचायतीचे लोक सांगतात. म्हणून जनावराले पाणी भेटाची बी सोय नाही. जंगलात आता चारा नाई मनून गहू सोंगून उरलेल्या तणसावरच त्यायच पोट भराव लागते. त्याच्यासाठी बी लय दूर जा लागते. अन पाण्यासाठी डबल गावात या लागते’’, अशा शब्दांत जनावर चारणाऱ्या मधुकर पोहरे या पशुपालकाने आपली व्यथा मांडली.

टिटवा (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथे गुरांना चारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मधुकर करतात. दुर्गम असलेल्या या गावातील शेतकऱ्यांकडे प्रत्येक खुट्याला दोन जनावरे तर कमीत कमी आहेत. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात या जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळे गावातील बहुतांश पशुपालक आपली गुरे मधुकर यांच्याकडे सोपवितात. 

गुराखी मधुकर यांच्याकडे आजमितीस ३०० जनावरे चारण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. गहू काढणीनंतर गव्हाचे काड तेवढे शेतात उरले आहे. हाच चारा म्हणून जनावरांसाठी रानात शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांकडे स्वतःची जनावरे असल्याने हे काडदेखील इतर जनावरांना दिले जात नाही. 

जंगलात नदी, नाले आणि पाण्याचे इतर स्रोतदेखील आटल्याने चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्यामुळे चाऱ्यासोबतच पाण्याकरितादेखील भटकंती करावी लागते, असेही मुधकर यांनी सांगितले.तीन ते चार किलोमीटर चाऱ्यासाठी फिरल्यानंतर जनावरांना पाणी पाजण्याकरिता परत गावातच आणावे लागते. ग्रामपंचायतच्या हौदावर पाण्याची सोय होते. परंतु अनेकदा वीज पुरवठा योग्य दाबाने होत नसल्याने त्या ठिकाणीदेखील पाणी उपलब्ध राहात नाही. सरपंच, उपसरपंचांकडे याबाबत अनेकदा बोलल्याचे ते सांगतात; परंतु समस्या आजही कायम आहे. लाइन आमच्या हातात नाही, असे त्यांच्याकडून सांगितले जाते, असेही मधुकर सांगतात. शासनाने ग्रामीण भागातील चारा-पाण्याचा प्रश्रन गंभीरतेने घेत जनावरांची संख्या अधिक असलेल्या भागात चारा छावण्याची उभारणी करावी, अशी मागणीही मधुकर करतात. 

जनावरापोटी मिळतात १०० रुपये
मधुकर पोहरे यांच्याकडे गावातील ३०० गुरे चारण्यासाठी आहेत. एका जनावरामागे १०० रुपये मजुरी मिळते, असे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यामुळे चारा-पाणी नसल्याने इतर पशुपालकदेखील आपल्याकडील जनावरे चारण्यासाठी देण्यासाठी विचारणा करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...