agriculture news in Marathi, now Vanamati brand of Organic Production, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य रोजच्या आहारात असल्यास त्यातून निरोगी आणि सशक्त पिढी घडणार आहे. त्यासोबतच सेंद्रिय शेतमालाला मागणीदेखील वाढणार आहे. त्याकरिता वनामती नावाने राज्यात सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस असून, पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत शासकीय आस्थापना, वसतिगृहांमध्ये सेंद्रिय शेतमालाचा उपयोग वाढविण्याचे आवाहन केले आहे.
- रवींद्र ठाकरे, संचालक, वनामती, नागपूर

नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे वाहत असताना आणि त्यासंदर्भाने नुसत्या पोकळ बाता होत असतानाच वनामतीने पुढाकार घेत राज्यात सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचा ब्रँड काढण्याचा निर्णय घेतला आहे. वनामती असेच या ब्रँडचे नाव राहणार असून, त्या-त्या जिल्ह्याचा उल्लेख ब्रँडच्या दर्शनी भागात केला जाणार आहे. 

गोंडखेरी येथील विभागीय सेंद्रिय शेती केंद्राने केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्र सद्यःस्थितीत सेंद्रिय शेती क्षेत्रात आघाडीचे राज्य आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सर्टिफिकेशनशिवाय राज्यात शेतमालाची विक्री सेंद्रियच्या नावाखाली होत असल्याचे चित्र आहे. सेंद्रियच्या नावाखाली होणारी लुबाडणूक येथेच थांबत नाही, तर अशा शेतमालासाठी अव्वाच्या सव्वा दरही ग्राहकांकडून आकारले जातात. या प्रकारावर नियंत्रणासोबतच सेंद्रिय शेतमालाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेद्वारा केला जाणार आहे.

सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट तसेच पीजीएस प्रमाणपत्रधारकांशी याकरिता संपर्क साधला जाईल. त्यांच्याकडे उपलब्ध  प्रमाणित शेतमालाचे पॅकिंग करून तो वनामती ब्रँडखाली राज्यभरात विकण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. वनामती पुणे, वनामती अहमदनगर, वनामती नागपूर असा उल्लेख पॅकिंगवर राहील. त्या-त्या जिल्ह्याची ओळख त्या उत्पादनाला देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र
वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. सेंद्रिय शेतमालाला मागणी वाढावी तसेच पौष्टिक आहार सेवन करता यावा याकरिता सहकार्याचे आवाहन यातून केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सैनिक तसेच विद्यार्थी वसतिगृह, कृषी विद्यापीठांचे वसतिगृह, तसेच इतर शासकीय व अशासकीय वसतिगृहांना सेंद्रिय शेतमाल खरेदीची सक्‍ती किंवा आवाहन करावे. यातून विद्यार्थी, रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळेल, त्यांचे आरोग्य सुधारेल असा उल्लेख आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांशीदेखील वनामती संपर्क साधणार असून, त्यांच्याद्वारे उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न होईल.


इतर अॅग्रोमनी
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढया सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ...
खाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईएनवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर...
देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७...पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख...
उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले...लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा गावातील रावसाहेब...
अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची...परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
केंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार;...नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन...
कापूस, मक्याला वाढती मागणी या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली,...
परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
साखर निर्यात अनुदान सहा महिन्यांपासून...कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी...
साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार...कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात...
सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने खरीप मका,...
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवरखत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती...कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...