agriculture news in marathi, Now, we will make a 'thok morcha' for the reservation. | Agrowon

आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018
नाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार फडणवीस सरकारला उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करून देणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
नाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार फडणवीस सरकारला उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करून देणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
केवळ आश्वासनांशिवाय समाजाच्या हातात काहीही मिळालेले नाही. त्यामुळे आता लेखी आश्वासनाशिवाय कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज मागे हटणार नाही. नाशिक जिल्ह्यासह राज्यातून लाखो मराठा समाजाचे स्वयंसेवक पंढरपूरला रवाना होणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे छावा क्रांतीवर संघटनेचे करण गायकर व अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तुषार जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाने आता ‘मूक’ मोर्चा ऐवजी ‘ठोक’ मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. परळीतून या आंदोलनाला सुरवात झाली असून, पंढरपुरात मराठा समाज व शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली, तर होण्याऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी ठेवावी, असा इशारा मोर्चातर्फे देण्यात आला.
भरतीप्रक्रियेला स्थगिती द्या
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर आरक्षित जागांवर भरतीप्रक्रिया घेण्याचे दिलेले आश्वासन फसवे असून, मराठा समाजाला डावलण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करतानाच मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत भरतीला स्थगिती देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री बदला, भाजपाला इशारा
भाजपाने नितीन गडकरी अथवा अन्य कोणी सक्षम व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवावे, परंतु मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
 
आमदारांना फिरू देणार नाही
मराठा समाजाचे सुमारे १४५ आमदार विधिमंडळात मूग गिळून गप्प बसले. मराठा समाजाला आरक्षण डावलून राज्यात भरती प्रक्रिया राबविली गेली, तर मराठा समाजाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...