`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती

`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती

सांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मिरज तालुका कार्यक्षेत्रात सर्व मुख्य कालवे, साखा कालवे आणि वितरिकांची गळती काढण्याचे काम हाती घेतले आहे. काही कालव्यांचे नव्याने अस्तरीकरण केले जात आहे. यासाठी बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

म्हैसाळ योजनेत समाविष्ट असलेल्या लिंगनूर, सलगरे, आरग, खटाव, कळंबी या कालव्यांची गळती काढण्यासाठी बारा कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. सध्या लिंगनूर, खटाव, बसरकुडी शाखा कालव्यांचे नव्याने अस्तरीकरण सुरू आहे. ८ ऑक्‍टोबर रोजी सुरू झालेले आवर्तन आठवडाभरात थांबेल; त्यानंतर बेडग, आरग आणि सलगरे मुख्य कालव्यांची गळती काढण्यात येईल. त्यासाठी निविदाप्रक्रिया, ठेकेदार निश्‍चितीची कामे पूर्ण झाली आहेत. 

योजना राबवताना कालव्यांचे अस्तरीकरण केले होते; त्यानंतर त्यांची दुरुस्ती अपवादानेच झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कालवे फोडून पाणी घेण्याचा प्रयत्न केला होता; त्यांची दुरुस्तीही आवश्‍यक आहे. योजनेतून पाणी मोजून कालव्यात सोडले जाते; त्याची पाणीपट्टी आणि वीजबिल शेतकऱ्यांना भरावे लागते. गळतीमुळे पैसे भरल्यानुसार पुरेसे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. ओढ्या-नाल्यांतून वाहून गेलेल्या आणि कर्नाटकात पोचलेल्या पाण्याचे पैसेही शेतकऱ्यांना भरावे लागतात. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा हा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे अस्तरीकरण व गळती काढण्याला प्राधान्य दिल्याचे कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे म्हणाले. येणाऱ्या आवर्तनावेळी कालव्यातून पाण्याची अजिबात गळती होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 

पेव्हर तंत्राने अस्तरीकरण 

आजवर कालव्याचे अस्तरीकरण मजुरांकडून पारंपरिक पद्धतीने होत होते. ते अनेकवेळा सदोष असायचे. सध्या यंत्राद्वारे पेव्हर पद्धतीने अस्तरीकरण केले जाते. यामध्ये मोजमापानुसार कॉंक्रिट आवश्‍यक तितक्‍या दाबाने वापरले जाते. त्यामुळे ते ढासळत, उखडत नाही. यामुळे पाण्याचा मोठा दाबही सहन करते. कामाची गती वाढते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com