agriculture news in marathi NTPC to set up 23 MW solar power plant | Agrowon

सोलापुरात ‘एनटीपीसी’ उभारणार २३ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

सोलापुरातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एनटीपीसी) वतीने २३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

सोलापूर : सोलापुरातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एनटीपीसी) वतीने २३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प या वर्षीच डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार आहे. त्याशिवाय आणखी ४० मेगावॉटची निर्मिती पुढील वर्षीपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विजेची मागणी वाढल्याने सौरऊर्जा प्रकल्पनिर्मितीच्या कामाला वेग देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाउनच्या काळातही ‘एनटीपीसी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होता. आता दिवाळीतही विजेची मोठी मागणी होणार असल्याने वीजनिर्मितीसह सौरऊर्जा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. वीजनिर्मितीवेळी सल्फर डायऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी एफजीडी प्रणाली या नव्या तंत्रज्ञान प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी दोन चिमण्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे पहिले युनिट २०२१ पर्यंत सुरू होईल. तर दुसरे युनिट दीड वर्षात पूर्ण होईल. या दोन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल, तसेच हवेत उडणाऱ्या राखेचे प्रमाणही शून्य राहणार असल्याचे एनटीपीसीकडून सांगण्यात आले.

कोळशाची उपलब्धता,उत्पादन खर्च झाला कमी
एनटीपीसीच्या प्रकल्पातील वीजनिर्मितीसाठी सोलापूरपासून दीड हजार किलोमीटरवरून ओडिशा राज्यातून कोळसा आणला जात होता. पण गेल्या सहा महिन्यांपासून तेलंगणा येथील सिंगारेनी कोलरिज कंपनी लिमिटेड या कंपनीकडून कोळसा उपलब्ध झाल्याने प्रति युनिटमागे एक रुपया उत्पादन खर्च कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वी प्रतियुनिटला ३ रुपये ८० पैसे येणारा खर्च आता २ रुपये ८० पैशांवर आला आहे. साहजिकच, विजेच्या कमी दरामुळे एनटीपीसीच्या विजेला मागणी वाढल्याचे एनटीपीसीचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पर यांनी सांगितले.

परराज्यांना वीजपुरवठा
सोलापूरच्या प्रकल्पातून ६०० मेगावॉटहून अधिक वीजनिर्मिती होते. या प्रकल्पातील वीज सध्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या राज्यांना पुरविली जाते. येत्या काळात ही क्षमता आणखी वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांमुळेही एनटीपीसी अतिरिक्त वीज उत्पादन करणार असल्याने विजेची मुबलक उपलब्धता होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...