Agriculture news in Marathi The number of Akola coronary patients is 105 | Agrowon

अकोल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०५ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

अकोला ः गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून शुक्रवारी (ता.आठ) हा आकडा शंभरावर पोचला. आता बाधितांची संख्या १०५ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८९ जणांचे अहवाल आले. त्यात १० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर ७९ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. त्याआधी गुरुवारी (ता. सात) १३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 

अकोला ः गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून शुक्रवारी (ता.आठ) हा आकडा शंभरावर पोचला. आता बाधितांची संख्या १०५ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८९ जणांचे अहवाल आले. त्यात १० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर ७९ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. त्याआधी गुरुवारी (ता. सात) १३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 

जिल्ह्यात १०५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील अकरा जणांचा मृत्यू झालेला असून १४ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ८) पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये सहा महिला असून एक १२ वर्षांची मुलगी सुद्धा आहे. तर चार पुरुष आहेत. आठ रुग्ण बैदपुरा तर एक भगतसिंह चौक आणि एक जुने शहरातील आहे. 

खासगी रुग्णालये अधिग्रहण करणार 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही वाढ सातत्याने महानगरपालिका हद्दीत असली तरी संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी वाढत्या रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी आता खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था केली आहे. अलगीकरण, विलगीकरण कक्षांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने अकोला शहरातील खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. 

जिल्ह्यात तालुक्याच्या सीमाबंद 
कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात रविवारी (ता. १७) मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू आहे. तथापि वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या सीमा बंद करणाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, अंतर्गत मार्गांवरील तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व परवानगी धारक वाहने वगळता अन्य वाहतूक बंद राहील. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...