Agriculture news in Marathi The number of corona positive cases in Akola is around four hundred | Agrowon

अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या चारशेपार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. सोमवारी (ता. २५) नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता बाधितांची संख्या चारशेपार गेली आहे. अकोल्यात आता ४०६ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला महानगरासह आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने अधिकच चिंता वाढली आहे.

अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. सोमवारी (ता. २५) नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता बाधितांची संख्या चारशेपार गेली आहे. अकोल्यात आता ४०६ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोला महानगरासह आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने अधिकच चिंता वाढली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळी नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सकाळी एकूण १८३ अहवाल आले. यातील १७४ अहवाल निगेटिव्ह आले.  सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी चार पुरुष व पाच महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फैल, देशमुख फैल, मोहता मिल नानकनगर, गोकूळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. रविवारी (ता. २४) रात्री २२ जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.  त्यातील तिघांना घरी तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात एक मे पासून कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढलेला आहे. या महिन्यात साडे तीनशेपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तेल्हारा तालुक्यात पाच रुग्ण मिळून आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून परतलेल्यांमुळे ग्रामीण भागात संसर्ग वाढत चालला आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...