वऱ्हाडात पक्षीय बलाबल कायम राहण्याची चिन्हे 

वऱ्हाडात पक्षीय बलाबल कायम राहण्याची चिन्हे 
वऱ्हाडात पक्षीय बलाबल कायम राहण्याची चिन्हे 

अकोला : वऱ्हाडातील १५ मतदार संघाची मतमोजणी सुरू असून भाजप पहिल्या तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसच्या जागा दोन राहणार असून राष्ट्रवादी खाते उघडण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीची घोडदौड आत्तापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये दिसून आली.  या निकालात अकोला पश्चिममध्ये गोवर्धन शर्मा, मूर्तिजापूरमध्ये हरीष पिंपळे,मलकापूरमध्ये चैनसुख संचेती, चिखलीत राहुल बोंद्रे, बुलडाणा मतदार संघात हर्षवर्धन सपकाळ हे विद्यमान आमदार पिछाडीवर पडले आहेत.  भाजपचे डॉ. संजय कुटे जळगाव जामोद , शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर मेहकर आणि अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर यांचा विजय निश्चित झाला आहे.  वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांतील एकूण १५ जागांसाठीची मतमोजणी सुरू आहे, दुपारी १२.३० वाजेपर्यंतचे मतमोजणीचे कल बघता भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, हरिष पिंपळे, चैनसुख संचेती तर काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे आणि हर्षवर्धन सपकाळ हे  पिछाडीवर गेल्याचे चित्र होते.  यापैकी गोवर्धन शर्मा आणि चैनसुख संचेती हे पाच वेळा सलग आमदार राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी ही स्थिती धक्कादायक आहे. काँग्रेसचे राहुल बोंद्रे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठीही धक्कादायक स्थिती आहे. भाजपचे विद्यमान मंत्री आणि जळगाव जामोद मतदार संघातील उमेदवार डॉ. संजय कुटे तसेच अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर तसेच मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी निर्णायक आघाडी घेतली असून ते विजयाच्या जवळ पोहोचल्याचे चित्र आहे. खामगावचे भाजप आमदार आकाश फुंडकर सुरुवातीला पिछाडीवर गेले होते मात्र, नंतर त्यांनी आघाडी घेतली आहे.

सध्या वऱ्हाडातील १५ मतदार संघात असे आहे चित्र आघाडीवरील उमेदवार संख्या

  • भाजप-७
  • शिवसेना-३
  • काँग्रेस-२
  • राष्ट्रवादी-१
  • वंचित-२  
  • अकोला पूर्व- रणधीर सावरकर (भाजप)
  • अकोला पश्चिम- साजीद पठाण (काँग्रेस)
  • बाळापूर-नितीन देशमुख (शिवसेना)
  • मूर्तिजापूर- प्रतिभा अवचार(वंचित आघाडी) 
  • अकोट- प्रकाश भारसाकडे(भाजप) 
  • बुलडाणा- संजय गायकवाड (शिवसेना)
  • चिखली- श्वेताताई महाले (भाजप)
  • मलकापूर- राजेश एकडे (काँग्रेस)
  • जळगाव जामोद- डॉ. संजय कुटे (भाजप) 
  • खामगाव- आकाश फुंडकर (भाजप)
  • सिंदखेडराजा- डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
  • मेहकर- डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)
  • कारंजा- राजेंद्र पाटणी (भाजप)
  • रिसोड- दिलीप जाधव (वंचित)
  • वाशीम- लखन मलिक (भाजप)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com