मराठवाड्यात १७२२ वर पोचली टॅंकरची संख्या

मराठवाड्यात १७२२ वर पोचली टॅंकरची संख्या
मराठवाड्यात १७२२ वर पोचली टॅंकरची संख्या

औरंगाबाद : पाणीटंचाई भीषणतेकडे वाटचाल करीत असलेल्या मराठवाड्यातील टॅंकरची संख्या १७२२ वर पोचली आहे. आठही जिल्ह्या़ंतील २८ लाखा़ंवर जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. १२८८ गावे व ४५६ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, पाणीटंचाई निवारण्यासाठी २४१७ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. 

यंदा मराठवाड्यावर भीषण पाणी संकटाचे संकट आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ५५० गावे व २१९ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद, पैठण, कन्नड, खुलताबाद, फूलंब्री आदी तालुक्‍यांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जालना जिल्ह्यातील २३९ गावे व ४२ वाड्यांना टंचाईची झळ बसत असून भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी, बदनापूर, अंबड तालुक्‍यांत टंचाईची तीव्रता अधिक आहे. बीड जिल्ह्यातील ४०४ गावे व १७५ वाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आष्टी, बीड, गेवराई, शिरूर, पाटोदा आदी तालुक्‍यात टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर तालुक्‍यांतील पाच गावांत टंचाई आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परभणी जिल्ह्यातील पाच गावांना टंचाईची झळ बसत असून त्यामध्ये पालम, पुर्णा, गंगाखेड तालुक्‍यांतील प्रत्येकी एक तर जिंतूर तालुक्‍यातील दोन गावांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातही १० गाव व २ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईग्रस्त गावांमध्ये कळमनुरी, सेनगाव तालुक्‍यांतील प्रत्येकी तीन, वसमत, औंढा ना. तालुक्‍यातील प्रत्येकी एक तर हिंगोली तालुक्‍यातील दोन गावांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ३४ गावे व १८ वाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामध्ये नांदेड तालुक्‍यातील ७ गावं ३ वाड्या, मुखेड तालुक्‍यातील २७ गाव व १५ वाड्यांचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १७२२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ७९१ टॅंकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ५१४, जालना २९३, उस्मानाबाद ५४, नांदेड ४२, हिंगोली १८, परभणी  ५, लातूर ५ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. 

२४१७ विहिरींचे अधिग्रहण  मराठवाड्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी सुरू असलेला टॅंकरचा पाणीपुरवठा व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करण्यासाठी २४१७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये टॅंकरला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या ८१६ व  टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठीच्या १६०१ विहिरींचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४३१, जालना ३९८, परभणी ८६, हिंगोली १३१, नांदेड ९२, बीड ६४७, लातूर २१७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com