सोलापूर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या पोचली २४१ पर्यंत

सोलापूर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या पोचली २४१ पर्यंत
सोलापूर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या पोचली २४१ पर्यंत

सोलापूर : जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता वरचेवर वाढतच आहे. सध्या २१७ गावांना आणि एक हजार ४२५ वाड्या-वस्त्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या टॅंकरची संख्या २४१ च्या घरात पोचली आहे. रोज या टॅंकरच्या माध्यमातून ५२४ खेपा होत असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यातील चार लाख ६२ हजार ९०९ जणांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मे महिन्यात टॅंकरची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या उन्हाची तीव्रताही वाढतेच आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. उन्हाची वाढती तीव्रता आणि पाण्याची खोल जाणारी पातळी, यामुळे टंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्‍यासाठी अद्याप एकाही गावाला टॅंकरची आवश्‍यकता भासलेली नाही. 

पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील ११६ विहिरी आणि बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जूनपर्यंत जिल्ह्यात साधारणतः ३५० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानुसार टॅंकरचे नियोजन करण्यात आले आहे. 

तालुकानिहाय टॅंकरसंख्या आणि बाधित लोक

तालुका  टॅँकर   लोकसंख्या
उत्तर सोलापूर १२  ३५ हजार ९७०
बार्शी १०  १६ हजार ८०८
दक्षिण सोलापूर २२ ५८ हजार ५०६
अक्कलकोट  ११  १६ हजार ८०६
माढा १७  ४१ हजार २७६ 
करमाळा ४३  ८८ हजार ८५७
मोहोळ १२  २५ हजार ५९०
मंगळवेढा ५५   ८३ हजार ६००
सांगोला ४८ ६५ हजार २३२
माळशिरस ११ ३० हजार २६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com