agriculture news in marathi, Nursery set up at Ekalahare power station | Agrowon

एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड उपक्रमांतर्गत १५००० वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले आहे. त्यानुसार १६००० हून अधिक रोपे तयार केली आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.
- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र

नाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

एकलहरे येथे केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजारो झाडे लावून मोठी हिरवळ निर्माण केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध फळांच्या बिया गोळा केल्या. त्यापासून रोपे तयार करण्यात आली. 

ही रोपवाटिका मुख्य अभियंता उमाकांत निखारे, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. यासाठी विवेक मोरे, प्राजक्ता घुले, सोमदत्त साठे, हरिष आहेर, संतोष येवले यांनी विशेष परिश्रम घेतले.

तयार केलेली रोपे
या रोपवाटिकेमध्ये शेवगा ७९८६, विलायती चिंच १४१०, आंबा १८०, फणस १७३०, सीताफळ ७००, करंज १०६०, आंबट चिंच १५८०, जांभूळ ८००, इतर (बेल, बेहड, वड) ३००, गुलमोहर ६००, बहावा १५० अशी एकूण - १६४९६ रोपे तयार केली आहेत.


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज र्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...