पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय

नत्राच्या कमतरतेमुळेझाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते. फळझाडांची वाढ खुरटी होते. फांद्या पाने आणि खोड बारीक होतात. मुळांची वाढ मंदावून विस्तार कमी होतो.
deficiency  Symptoms in sugarcane and rice crop
deficiency Symptoms in sugarcane and rice crop

नत्राच्या कमतरतेमुळे झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते. फळझाडांची वाढ खुरटी होते. फांद्या पाने आणि खोड बारीक होतात. मुळांची वाढ मंदावून विस्तार कमी होतो. पानांचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो. पानांच्या कडा व टोके जळाल्या सारख्या दिसतात.  नत्र कमतरतेची लक्षणे 

  • झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते. फळझाडांची वाढ खुरटी होते. फांद्या पाने आणि खोड बारीक होतात.  
  • मुळांची वाढ मंदावून विस्तार कमी होतो. पानांचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो. पानांच्या कडा व टोके जळाल्या सारख्या दिसतात. 
  • फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. कोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये पाने कमी लागतात. गड्डा तयार होण्याची क्रिया मंदावते. कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये जुन्या पानांवर पिवळे नारंगी व तांबडे डाग पडतात. आंब्याच्या फळांचा आकार बिघडतो.
  • उपाय 

  • पिकास नत्राच्या खत मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात.
  • लक्षणे दिसताच युरियाची एक टक्के या प्रमाणे फवारणी करावी. (युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी)
  • स्फुरद कमतरतेची लक्षणे  पाने हिरवट, लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते. पिकातील मुळांची वाढ खुंटते. पाने कमी लागतात. पानाचा आकार बारीक होतो. देठ वाकडेतिकडे होतात. खालच्या पानावर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके दिसतात. पाने अकाली गळतात. फळ झाडांना मोहर कमी येऊन फळे कमी लागतात. फळांचा पक्वता काळ लांबतो. बटाट्याच्या आतील भागात तांबूस गंज दिसतो. आंब्याच्या पानावर खालच्या बाजूस लालसर जांभळी चट्टे दिसतात. कडा लालसर जांभळ्या दिसतात. उपाय 

  • स्फुरद खत मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात.
  • पीक घेण्याआधी हिरवळीच्या खताचे पीक घेऊन त्यास स्फुरदाची मात्रा द्यावी. हिरवळीचे पीक त्याच शेतामध्ये गाडावे. 
  • डाय अमोनियम फॉस्फेटची १ % प्रमाणे (डीएपी १- ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. 
  • पालाश कमतरतेची लक्षणे  पानांच्या कडा तांबूस होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात. पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करतो. वाळल्यासारखा दिसतो. खोड कमकुवत होते. फळांची गुणवत्ता बिघडते. बटाट्यात व पानावर पोकळपणा येतो. भाजीपाला व फळांची टिकण्याची क्षमता कमी होते. फळांची आम्लता कमी होते. गळिताच्या पिकात तेलाचे प्रमाण कमी होते. पानाच्या कडा जांभळ्या होऊन नंतर करपल्यासारख्या दिसतात. त्याच शेंडा मर रोग असे म्हणतात. केळीवर फ्युजॅरियम विल्ट या रोगाचा प्रादुर्भाव होतो. द्राक्षाचे घड लहान व घट होते. टोमॅटोमध्ये बॅक्टरियल ब्लाईट हा रोग वाढतो. उपाय  शिफारशीप्रमाणे पालाशच्या खतमात्रा पिकास द्याव्यात. आवश्यकतेनुसार सल्फेट ऑफ पोटॅशची अर्धा टक्के (सल्फेट ऑफ पोटॅश ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) गंधक कमतरतेची लक्षणे  पानांचा मूळचा रंग कमी कमी होत नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.   गंधकाच्या कमतरतेची लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखीच दिसतात. पाने व देठ यांचा आकार बारीक होतो. कोबीवर्गीय पिकात खालची व वरची पाने तांबडी व जांभळी होतात. केळीमध्ये शेंड्याकडील पाने लहान होऊन ती गुच्छासारखी दिसतात. द्राक्षामध्ये फळ कुजव्या रोगाची प्रमाण वाढते. नारळाचे खोबरे चामड्यासारखे चिवट होते. उपाय  

  • नत्राच्या मात्रा देताना अमोनिअम सल्फेट या खताचा वापर करावा. त्यातून काही प्रमाणात गंधकाचा पिकास पुरवठा होतो.
  • हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनींतून शेणखतासोबत मिसळून द्यावे. 
  • कॅल्शिअम  कमतरतेची लक्षणे  मुळाच्या टोकाकडील भागाची वाढ चांगली होत नाही. कळ्या, फुले, फुलोरा गळतो. पीक अवेळी फुलोऱ्यावर येते. कोवळ्या पानांच्या कडा वेड्यावाकड्या होतात. पाने वाजवीपेक्षा जास्त काळपट दिसतात. लिंबूवर्गीय व घेवड्याची पाणी दुमडतात. उपाय   स्फुरद खताच्या मात्रा देताना डाय कॅल्शियम फॉस्फेट या खताचा वापर करावा. त्यातून काही प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होईल. लोह कमतरतेची लक्षणे  नवीन किंवा शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते. अति उणीव असल्यास पाने प्रथम पिवळट व नंतर पांढरी दिसू लागतात. उपाय  चिलेटेड लोहाची ०.२ %  (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. किंवा ५ ते २५ किलो हिराकस प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. मॅग्नेशिअम  कमतरतेची लक्षणे   देठ, पानाच्या कडा व शिरांमधील भागांचा रंग कमी होतो. पाने लहान आकाराची निघून त्यांची गुंडाळणे बनते. कवळी पाने पातळ ठिसूळ बनून सुकतात. फांद्या नाजूक होतात व वाकतात. हरितद्रव्यांची कमतरता भासते. द्राक्षामध्ये खोडकुज रोग होतो. उपाय   मॅग्नेशिअम सल्फेट अर्धा ते दोन किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे २ टक्के द्रावणाची फवारणी करावी. जस्त कमतरतेची लक्षणे  पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.  उपाय   चिलेटेड झिंक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किंवा कमतरतेच्या प्रमाणानुसार झिंक सल्फेट २ ते २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत टाकावे. मंगल (मॅंगनीज) कमतरतेची लक्षणे  पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो. नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पर्ण फिक्कट होऊन गळते.  उपाय  चिलेटेड मंगल २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तांबे कमतरतेची लक्षणे   झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते. खोडांची वाढ कमी होते, पाने गळतात. विशेषतः लिंबूवर्गीय झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. उपाय मोरचूद ४ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी.  बोरॉन कमतरतेची लक्षणे  झाडांचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. फुलगळ होते व फळांना तडे जातात. पानावर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळावर देखील तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.   उपाय  बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. या खताचा वापर जमिनीत करावयाचा असल्यास तीन वर्षांतून एकदाच करावा. जास्त प्रमाणात हे खत जमिनीस टाकल्यास जमीन नापीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे खते देताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आवश्यकता भासल्यास बोरिक ॲसिड पावडर ०.२ ते ०.३ % (२ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. मॉलिब्डेनम  कमतरतेची लक्षणे   पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.  उपाय 

  • सोडिअम मॉलिब्डेनम ०.२५ ते ०.५ किलो प्रति हेक्टर जमिनीतून देणे. 
  • सोडिअम मॉलीब्डेट ०.५ ते १ ग्रॅम प्रति १० लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
  • संपर्क- विलास सातपुते, ९९२३५७५६८५ (साहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व रसायन शास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.) अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com