agriculture news in marathi, Nutrients management is very importennt in incrise the sugarcane production | Agrowon

ऊस उत्पादनवाढीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य द्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018
सोलापूर  : "ऊस उत्पादनवाढीमध्ये पाणी व्यवस्थापनाला महत्त्व आहे, पण त्याहीपेक्षा अधिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे,'' असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. बी. एस. कदम यांनी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे व्यक्त केले.
 
सोलापूर  : "ऊस उत्पादनवाढीमध्ये पाणी व्यवस्थापनाला महत्त्व आहे, पण त्याहीपेक्षा अधिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे,'' असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. बी. एस. कदम यांनी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे व्यक्त केले.
 
‘ॲग्रोवन' आणि स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लि. पुणे यांच्या वतीने आयोजित ॲग्रोसंवादमध्ये ‘ऊस उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. कदम बोलत होते. सरपंच मुन्ना कुडले, प्रकाश पुजारी, स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लि. पुणेचे विक्री व्यवस्थापक विश्‍वजित पाटील, व्यवस्थापक विशाल इनामदार, बसवराज हविनाळे, दाऊद पटेल, सिद्धराम सोनार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, "ऊस लागवडीपूर्वी जमिनीची प्रत, त्याचा कस तपासण्यासाठी मातीपरीक्षण महत्त्वाचे आहे. त्यात मुख्यतः सामू, क्षारांचे प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब किती आहे, हे तपासणे आवश्‍यक आहे. त्यानुसार ऊस लागवड नियोजन फायदेशीर ठरेल. उसाचे बेणे शुद्ध आणि गुणवत्तेचे घ्यावे, त्याची बेणेप्रक्रिया करावी, तसेच एक किंवा दोन डोळे पद्धतीची टिपरी वापरून लागवड करावी. चार ते साडेचार फुटांपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार सरी पाडून घ्यावी.’’
‘‘आंतरपिके विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार घ्यावीत, तणनाशकाचा वापर केल्यास खुरपणी, मशागतीचा अतिरिक्त खर्च वाचेल. उसाची एकरी संख्या ही किमान  ५० ते ५५ हजारांपर्यंत असावी, तरच उत्पादकता चांगली मिळू शकेल. पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, पण उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळबांधणी ते मोठी बांधणी आणि काढणीपर्यंत त्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. पण सेंद्रिय आणि रासायनिक असा दोन्हींचा समान पद्धतीने वापर करावा.''
डॉ. कदम यांनी खोडवा व्यवस्थापनावरही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. ‘ॲग्रोवन’चे क्षेत्रिय प्रतिनिधी संदेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विशाल इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद मुंडे यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८...हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात...
पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या...पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार...
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरीसिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने...
कोल्हापुरातील बहुतांश तालुक्यांना...कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पावसाने रविवारी (ता. ३१...
सोलापुरातील चार मध्यम प्रकल्पांमध्ये...सोलापूर ः लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या...
टेंभू योजनेतून आटपाडी तालुक्यातील पंधरा...आटपाडी, जि. सांगली ः टेंभू योजनेच्या पाण्यातून...