नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
पालेभाज्या
पोषण बाग असावी दारी
आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी; जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही.
आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी; जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही.
निरोगी जीवनासाठी भाजीपाल्याची गरज आहे. भाजीपाल्यांमधून सर्वप्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे उपलब्ध होतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
परसबागेचे फायदे
- घरच्या घरी ताज्या, पौष्टिक भाजीपाल्याची उपलब्धता.
- सेंद्रिय भाजीपाला रोजच्या आहारासाठी मिळतो, खर्च कमी होतो.
- नियमित सकस भाजीपाला खाल्ल्यामुळे रक्तक्षय व पोषकतत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार कमी होतात.
- घराभोवतीचा परिसर छान दिसतो.
परसबागेतील लागवडीचे नियोजन
खरीप हंगाम (जून ते ऑक्टोबर)
वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, चवळी, दोडका, कारली, काकडी, दुधी भोपळा, मुळा, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू.
रब्बी हंगाम (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, वांगे, मिरची, फ्लॉवर, कोबी, मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण, बटाटा, दोडका, कारली, दुधीभोपळा.
उन्हाळी हंगाम (मार्च ते जून)
भेंडी, चवळी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, घेवडा, भोपळा, कारली, दोडका, काकडी, राजगिरा, पालक.
भाजीपाल्याची दैनंदिन गरज (प्रतिव्यक्ती, प्रतिग्रॅममध्ये)
भाजी | पुरुष | स्त्री | लहान मुले | |||||||
बैठे काम करणारा | मध्यम मेहनत करणारा | जास्त मेहनत करणारा | बैठे काम करणारी | मध्यम मेहनत करणारी | जास्त मेहनत करणारी | १-३ वर्षे | ४-६ वर्षे |
१०-१२ वर्षे (मुले) |
१०-१२ वर्षे (मुली) | |
पालेभाज्या | ४० | ४० | ४० | १०० | १०० | १०० | ४० | ५० | ५० | ५० |
इतर भाज्या | ५० | ६० | ८० | ५० | ५० | ६० | १० | २० | ३० | ३० |
कंदमुळे | ६० | ७० | ८० | ४० | ४० | १०० | २० | ३० | ५० | ५० |
संपर्क- माधुरी रेवणवार, ८९९९५६०६८२
(गृहविज्ञानतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड)