उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामान

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटण्याचे दाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात.
Green pea
Green pea

वाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.  वाटण्याचे दाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या वाटाण्यांचा उपयोग भाजीसाठी करता येतो. वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम ही खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.  सरासरी तापमान १० ते १८ अंश सेल्सिअस असल्यास पिकाची वाढ चांगली होते. भेंडी

  • भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे. भेंडीमध्ये कॅल्शिअम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. खरीप व उन्हाळी हंगामात हे पीक चांगले येते.
  •  भेंडीचे पीक हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. या पिकास २० ते  ४० अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना अन्य भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळ्यात भाज्यांची चणचण असताना भेंडीला बाजारात अधिक मागणी राहते.
  • काकडी  कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशातही पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते. कोथिंबीर

  • कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबिरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते. मात्र कोथिंबिरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते.  
  • कोथिंबिरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड करता येते. उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते. कोथिंबिरीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक चांगले येते.
  • कोबी कोबीचे पीक सामान्यतः थंड व आर्द्र हवामानात चांगले येते. त्यामुळे त्याची मुख्यतः हिवाळी पीक म्हणून लागवड केली जाते. डोंगराळ भागात वसंत ऋतूमध्ये व उन्हाळ्यात लागवड करतात.   गवार गवार हे उष्ण हवामानातील पीक असून, सरासरी १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक उत्तम येते. खरिपातील उष्ण व दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास या पिकाची वाढ चांगली होते. गाजर  गाजर हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान असावे लागते. गाजराचा रंग १० ते १५ अंश सेल्सिअस आणि २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाला फिक्कट होतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळते. या काळात गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. मात्र गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांपर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी १८ ते २४ अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक आहे. ढोबळी मिरची

  • महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.  ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्यत्वे  फळातील कॅपसीनच्या प्रमाणावर अवलंबून असतो. ते साधारणतः २ ते ४ टक्क्यांपर्यंत असते.
  • या पिकाला दिवसाचे सरासरी  २५ अंश सेल्सिअस व रात्रीचे १४ अंश सेल्सिअस तापमान मानवते. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास व ठिपके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
  • बटाटा बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ अंश सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात २४ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, बटाटे पोसण्याच्या काळात २० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते. शेवगा शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलगळ होते. मुळा मुळा हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे. मुळ्याची वाढ २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते. उत्तम स्वाद आणि तिखटपणा कमी राहण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात १५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान असावे. मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो.  कांदा कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, नगर सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मराठवाडा, विदर्भ व कोकणातसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.  कांदा हे हिवाळी हंगामातील पीक आहे. महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची २ ते ३ पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते. संपर्क : कु. वैशाली मिसाळ, ७७९८६०८९३२, ८७८८३६२१८७ (कृषी हवामानशास्त्र विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com