ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः थोरात

डेटा देणार की नाही, देणार असतील तर केव्हा द्यायचा, हा सर्वस्वी आयोगाचा अधिकार आहे. या विषयावर सर्वच जण सकारात्मक आहेत आणि ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना मिळाला पाहिजे,
balasaheb thorat
balasaheb thorat

नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर केव्हा द्यायचा, हा सर्वस्वी आयोगाचा अधिकार आहे. या विषयावर सर्वच जण सकारात्मक आहेत आणि ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमि‘का आहे,’’ अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.   ओबीसी आरक्षणाची सद्यःस्थिती काय आहे, असे विचारले असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला मी स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होते. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यही उपस्थित होते. बैठक अत्यंत चांगली झाली आणि सद्यःस्थितीतील सर्व विषयांवर योग्य मार्ग निघणार आहे. सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललेले नाहीत आणि ज्या मोदीबद्दल ते बोलले, तो मोदीसुद्धा त्यांनी दाखवून दिलेला आहे. मग आता शिल्लक काय राहिले. तुम्हाला यापेक्षाही जास्त चांगलं स्पष्टीकरण पाहिजे असेल, तर नानाभाऊ नागपुरातच राहतात, तुम्ही त्यांना विचारा, ते अधिक स्पष्टपणे तुम्हाला सांगतील,’’ असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूरच्या पत्रकारांना दिला. बाळासाहेब म्हणाले, ‘‘राजकारण हे तत्त्वांचे, विचारांचे असले पाहिजे. व्यक्तिगत द्वेषाचे असू नये, एक राजकीय जीवनप्रणाली असली पाहिजे, या मताचा मी आहे.’’ 

‘‘नाराजीचा कुठेही विषय नाही’’  ‘‘अर्थमंत्री अजित पवार आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या खात्यांना जादा निधी देतात आणि इतरांवर अन्याय होतो. त्यामुळे अजितदादांवर काँग्रेसचे मंत्री नाराज आहेत का,’’ असे विचारले असता बाळासाहेब म्हणाले, की एकाच पक्षाचे सरकार जरी असलं तरी थोडीफार ओढाताण ही होतच असते. आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येकच पक्षाच्या मंत्र्यांना वाटते, की आपल्या विभागाला जास्त निधी मिळाला पाहिजे आणि तशी मागणी ते करीत असतात. त्यामुळे या गोष्टी सरकारमध्ये चालतच असतात. त्यात नाराजीचा कुठेही विषय नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com