परभणी जिल्ह्यात २०० बायोगॅसचे उद्दिष्ट

परभणी जिल्ह्यात २०० बायोगॅसचे उद्दिष्ट
परभणी जिल्ह्यात २०० बायोगॅसचे उद्दिष्ट

परभणी ः राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमाअंतर्गत २०१८-१९ साठी जिल्ह्यात २०० बायोगॅस सयंत्र बांधकामाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४१ बायोगॅसची संयत्रांची बांधकामे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हणुमंत ममदे यांनी माहिती दिली.

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण घटकासाठी १८१, अनुसूचित जातीसाठी १४, अनुसूचित जमातीसाठी ५ असे एकूण २०० बायोगॅस सयंत्रनिर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये परभणी, जिंतूर, सेलु, पालम तालुक्यांमध्ये प्रत्येकी २० तर मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १९ बायोगॅस बांधकामाचे उद्दिष्ट आहे. पूर्णा तालुक्यामध्ये  सर्वाधिक ४४ बायोगॅस बांधकामाचे उद्दिष्ट आहे. २ ते ४ घनमीटरच्या बायोगॅस सयंत्रासाठी सर्वसाधारण वर्गावारीतील लाभार्थींना १ हजार २०० रुपये तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३०० रुपये अनुदान देय राहणार आहे.

बायोगॅस संयत्रास शौचालयाची जोडणी दिल्यास १ हजार ६०० रुपये अनुदान लाभार्थ्यांला दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील गवंड्यांना इंदूर (मध्यप्रदेश) येथील बायोगॅस विकास व प्रशिक्षण, ऊर्जा अभ्यास संशोधन केंद्रातील तज्‍ज्ञ प्रशिक्षकाकडून झरी (ता. परभणी) येथे दोन दिवसांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

आजवर परभणी तालुक्यात ७, जिंतूर, सोनपेठ प्रत्येकी १, सेल तालुक्यात ३, गंगाखेड तालुक्यात ९, पूर्णा तालुक्यात ६, मानवत तालुक्यात २, पालम तालुक्यात ४ असे एकूण ४१ बायोगॅस सयंत्राची बांधकामे पूर्ण झाली आहेत असे श्री. ममदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com