परभणी जिल्ह्यात रब्बीतील पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दूरच

The objective of Rabi's crop loan distribution in Parbhani district is far from over
The objective of Rabi's crop loan distribution in Parbhani district is far from over

परभणी : यंदा रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ३१) पर्यंत जिल्ह्यातील विविध बॅंकांनी ९ हजार २६३ शेतकऱ्यांना ६६ कोटी ५३ लाख (२१.२२ टक्के) पीक कर्जवाटप केले. त्यात ७ हजार ८१६ शेतकरी नवीन आहेत. आजवर जिल्ह्यातील १ हजार ८१९  शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली. सर्वच बॅंकांचे पीक कर्जवाटपाची गती संथ असल्यामुळे उद्दिष्टपूर्ती दूरच आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील विविध बॅंकांना मिळून एकूण ३१३ कोटी ४७ लाख रुपयांच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांना १७३ कोटी १३ लाख रुपये, खासगी बॅँकांना ३३ कोटी ९८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ७४ कोटी ५४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. 

शुक्रवार (ता. ३१) पर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांनी ४ हजार ३६४ शेतकऱ्यांना ३३ कोटी ८१ लाख रुपये (१९.५३ टक्के) पीक कर्जवाटप केले. खासगी बॅंकांनी १ हजार ५७८ शेतकऱ्यांना १२ कोटी ९६ लाख रुपये (३८.१४ टक्के) पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १ हजार ७७६ शेतकऱ्यांना १४ कोटी १६ लाख रुपये (४४.५० टक्के), जिल्हा बॅंकेने १ हजार ५४५ शेतकऱ्यांना ५ कोटी ६० लाख रुपये (७.५१ टक्के), तर सर्व बॅंकांनी एकूण ९ हजार २६३ शेतकऱ्यांना ६६ कोटी ५३ लाख रुपये (२१.२२ टक्के) वाटप केले.

रब्बीत आजवर जिल्ह्यातील ७ हजार ८१६ नवीन शेतकऱ्यांना ५२ कोटी २५ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले. एकूण १ हजार ८१९  शेतकऱ्यांनी १५ कोटी ९२ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले. गतवर्षी (२०१८) रब्बी हंगामात जानेवारी अखेरपर्यंत २ हजार ५०२ शेतकऱ्यांना १९ कोटी ९७ लाख रुपये (६.३७ टक्के) एवढे पीक कर्जवाटप केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त रकमेचे पीक कर्जवाटप झाले आहे.

पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या
राष्ट्रीयकृत बॅंका  १७३.१  ३३.८१  १९.५३ ४३६४
खासगी बॅंका ३३.९८ १२.९६ ३८.१४ ३८.१४
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ३१.८२ १४.१६ ४४.५० १७७६
जिल्हा मध्यवर्ती बॅंक  ७४.५४ ५.६०  ७.५१ १५४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com