Agriculture news in marathi, Objectives of agricultural loan credit of Rs 1.70 crore | Page 2 ||| Agrowon

हिंगोली : पावणेदोन कोटीचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्जवाटपासाठी १ हजार ४४३ कोटी ४७ लाख रुपये आणि कृषी मुदत कर्जासाठी २७३ कोटी ५८ लाख रुपये असे एकूण १ हजार ७१७ कोटी ५ लाख रुपये एवढे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ‘नाबार्ड’च्या सूत्रांनी दिली.

हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्जवाटपासाठी १ हजार ४४३ कोटी ४७ लाख रुपये आणि कृषी मुदत कर्जासाठी २७३ कोटी ५८ लाख रुपये असे एकूण १ हजार ७१७ कोटी ५ लाख रुपये एवढे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ‘नाबार्ड’च्या सूत्रांनी दिली.

जिल्हास्तरीय सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण सिंदकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पी. ए. जंगम, जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक धनाजी बोईले, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मैत्रेवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती उपक्रमाचे प्रकल्प संचालक डॉ. घुले, जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक-नाबार्डने २०२०-२१ या आर्थिक संभाव्य पतपुरवठा आराखड्याचे विमोचन जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या पतपुरवठा आराखड्यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी २ हजार ३३४ कोटी ६५ लाख रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीककर्जासाठी १ हजार ४४३ कोटी ४७ लाख रुपये, शेती मुदत कर्जासाठी २७३ कोटी ५८ लाख रुपये, लघु, मध्यम आणि छोट्या उद्योगांसाठी ३३५ कोटी ६८ लाख रुपये, यानुसार पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. 

चालू आर्थिक वर्षात सर्वच बॅंकांनी खरीप पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टात केवळ ७ लाख रुपयांची वाढ करण्यात आली. या वेळी जयवंशी तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना रब्बी हंगामातील पीक कर्जवाटपाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...