सर्वसामान्य, तरुण पिढीशी माझी बांधीलकी ः शरद पवार

Obligation to the general public: Sharad Pawar
Obligation to the general public: Sharad Pawar

मुंबई ः आपली बांधीलकी सर्वसामान्य माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १२) व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १२) यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बळिराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या वेळी पवार साहेबांचा प्रवास सांगणारी चित्रफितही दाखवण्यात आली. शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, शिवसेना नेते मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. तसेच खासदार श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, सुनील तटकरे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.

माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही; परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. १९३६ मध्ये लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता, असेही शरद पवार म्हणाले. सार्वजनिक जीवनात यश मिळते. संकटे येतात. त्या वेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस, असेही शरद पवार म्हणाले. आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्या वेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल, असेही शरद पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांची मुले सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहतील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन या वेळी शरद पवार यांनी दिले. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी  ८० लाखांचा निधी ः जयंत पाटील  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत असल्याने वाढदिवस साजरा करायचा नाही अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. मात्र, हा वाढदिवस शेतकऱ्यांना समर्पित करून बळिराजाला मदत करायची, अशी भूमिका मांडल्यावर त्यांनी होकार दिला. ८० लाख रुपयांचा निधी बळिराजासाठी कृतज्ञता निधी म्हणून देणार आहोत. यातील रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावे ‘फिक्स डिपॉझिट’ केली जाईल. त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत, अशी भूमिका यामागे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com