प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून ‘वेधशाळा’

वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी ‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुण्यातील विज्ञान भारती या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
'Observatory' to be set up in every school through public participation
'Observatory' to be set up in every school through public participation

पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी ‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुण्यातील विज्ञान भारती या संस्थेने पुढाकार घेतला आहे. शाळेत घेतल्या जाणाऱ्या पावसाच्या नोंदी व वादळ यासह बदलते तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांची उपयुक्त माहिती स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पिकांचे नियोजन करता येणार आहे.

संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. हा प्रकल्प लोकसहभागातून निर्माण झाला आहे. त्याचे तंत्रज्ञान सर्वांसाठी मोफत व खुले आहे. हे तंत्रज्ञान पुण्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक विभागातील विद्यार्थ्यांनी अल्प खर्चात व आपल्या परिसरातील गरजेनुसार तयार करू शकणार आहेत. तसेच दुर्गम भागातील गावामधील शाळेत तो उभारून इयत्ता ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी व शिक्षक यांना तो हाताळता येईल व त्याचे पालकत्व त्यांच्याकडे देऊन त्यांना हवामानाचे प्रशिक्षण देऊन त्याचे महत्त्व या विषयी जनजागृती करावी, या हेतूने साकारला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हवामानविषयक माहिती कळण्यासाठी पुणे वेधशाळेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जीवन प्रकाश कुलकर्णी हे हवामानविषयक पाठ्यपुस्तक तयार करीत आहेत. हवामान केंद्र स्वनियंत्रित, सौर ऊर्जेवर चालणारे व इंटरनेटने जोडलेले आहे. साधारण दर दहा सेकंदाने त्याची माहिती अद्ययावत होते. त्याच्या सांकेतिक स्थळावरून मोबाइल फोनमध्ये पाहता येते.

डहाणू तालुक्यातून प्रारंभ विज्ञान भारतीच्या विज्ञान प्रशिक्षण या प्रकल्पाअंतर्गत लोकसहभागातून ‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ या योजनेचा डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील ग्राममंगल ऐने येथील ग्राममंगल मुक्त शाळेपासून रविवारी (ता. १९) प्रारंभ होत आहे. त्याचे पुणे वेध शाळेतील माजी हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com