Agriculture News in Marathi Observed off for the incident in Uttar Pradesh; When to help farmers in the state? | Agrowon

उत्तर प्रदेशातील घटनेसाठी बंद पाळला;  राज्यातील शेतकऱ्यांना मदत कधी? 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व केंद्र सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. पण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूर, पावसामुळे जुलै महिन्यापासूनच अडचणीत सापडले आहेत.
 

अकोला : लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व केंद्र सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. पण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूर, पावसामुळे जुलै महिन्यापासूनच अडचणीत सापडले आहेत.

प्रत्येक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा ससेमिरा सुरूच आहे. आर्थिक मदतीची घोषणा सरकारकडून वेळोवेळी करण्यात आली. परंतु अजूनही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचली नाही. ही मदत केव्हा देणार, अशी विचारणा भारत कृषक समाजातर्फे करण्यात आली आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीचे पत्रही पाठवल्याचे महाराष्ट्र कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी सांगितले. 

या बाबत म्हटले आहे, पीक नुकसानाचे पंचनामे अर्धवट झाले. विमा कंपनीच्या माध्यमातून अँडव्हान्स २५ टक्के रक्कम ताबडतोब देण्याचे आदेश झाले. परंतु अजूनही शेतकऱ्यांची या सणासुदीच्या दिवसांत आर्थिक मदतीची प्रतीक्षा सुरूच आहे. मागील वर्षीच्या सोयाबीन पीकविम्यासाठीही अजूनपर्यंत काही ठोस निर्णय नाही. कागदोपत्री बोगस पीक कापणी प्रयोगासंबंधी पण काही कारवाई नाही. शासनाने आता लवकरात लवकर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी थकीत असलेला पीकविमा, कर्जमाफीची रक्कम, अतिवृष्टीग्रस्तांची मदत लवकर देण्याची मागणी करण्यात आली आहे.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...