Agriculture news in marathi Obstacles to DSC Take action if brought | Agrowon

‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय स्वाक्षरी प्रमाणपत्रांचे (डीएससी) कामकाज रखडणे ही गंभीर बाब आहे. या प्रक्रियेत अडथळे आणल्यास यापुढे कठोर कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत. 

पुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय स्वाक्षरी प्रमाणपत्रांचे (डीएससी) कामकाज रखडणे ही गंभीर बाब आहे. या प्रक्रियेत अडथळे आणल्यास यापुढे कठोर कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

 केंद्राकडून पंधराव्या वित्त आयोगापोटी राज्याला पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. मात्र त्यातील तीन हजार कोटींचा निधी पडून आहे. यामुळे हजारो ग्रामपंचायती निधीविना ताटकळल्या आहेत. सरपंच व ग्रामसेवकांची वेळेत ‘डीएससी’ न केल्यामुळे हा गोंधळ तयार झाला झाल्याचे वृत्त ‘अग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ग्रामविकास खात्याने दखल घेत जिल्हा परिषदांना तंबी दिली आहे. 

 राज्यात २८ हजार ८७५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त सहा हजार ‘डीएससी’ पूर्ण झालेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी वेळत दफ्तर उपलब्ध करून न दिल्यामुळे ‘डीएससी’ रखडली आहे.‘डीएससी’ झाल्यानंतरच वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना मिळू शकतो. हा निधी केवळ ‘पीएफएमएस’ या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातूनच मिळू शकतो. ‘पीएफएमएस’ प्रणाली केवळ ‘डीएससी’ झालेली असेल तर उपयुक्त ठरते. गैरव्यवहार रोखण्यासाठी ही पद्धत लागू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

 ‘डीएससी’ रखडल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामविकासमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. लोकप्रतिनिधींनी देखील तक्रारी केल्याने ग्रामविकास विभागाने आता कडक भाषेत एक परिपत्रक जारी केले आहे. उपसचिव प्रवीण जैन यांनी ‘डीएससी’च्या कामाची अंतिम सर्व जबाबदारी ‘सीईओं’वर दिली आहे. 

 ‘‘डीएससी’ रखडल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहिला आहे. प्रियासॉफ्टवेअर आणि पीएफएमएस प्रणालीवर ‘डीएससी’ पूर्ण करण्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे पडला आहे. ही बाब आपल्या राज्याच्या प्रतिमेला तडा देणारी आहे. केंद्र शासनाने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे,” असे ग्रामविकास विभागाने 
म्हटले आहे.

विकासाला खीळ
ग्रामपंचायतींच्या विकासकामांना ‘डीएससी’ अभावी खीळ बसली आहे. जिल्हा परिषदांमधील सीईओंनी ही बाब अतिशय गांभीर्याने घ्यावी. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या तीनही स्तरावर ‘डीएससी’ करावी लागते. हे काम युद्धपातळीवर आठवडाभरात करा. या कामात कोणीही असहकार्य करीत असेल किंवा कुचराई करीत असल्यास कठोर कारवाई करा, अशी तंबी ग्रामविकास विभागाने सीईओंना दिली
आहे.   

‘डीएससी’ रखडण्याची तीन कारणे 

  • - ग्रामसेवकांनी केंद्रचालकांना दस्तावेज दिले नाहीत. त्यामुळे प्रियासॉफ्टमध्ये ‘डे बुक’ व ‘इयर बुक’ची कामे अर्धवट राहिली. 
  • - चौदाव्या वित्त आयोगाचे वार्षिक पुस्तक पूर्ण (क्लोज्ड) केलेले नाही. 
  • - ग्रामसेवक व सरपंचांनी स्वतःहून डीएससी उपलब्ध करून दिलेली नाही. 

इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...